खरीपातील बादशहा-मूग;जाणून घ्या खाण्याचे फायदे

0
701

खरीपातील बादशहा-मूग;जाणून घ्या खाण्याचे फायदे
ग्लोबल न्यूज: या वर्षी खरीपातील सर्वच नक्षत्रं दमदार बरसल्यामुळे पिके जोमाने आले आहेत. खरीपामध्ये आमच्या कडे कडधान्ये अमाप प्रमाणात पिकवतात. मूग या कडधान्याला खरीपातील बादशाहा म्हणून ओळखले जाते.

भारतीय मूळ असलेल्या या मुगाची परिचय सर्वांना असून हे कडधान्य सध्या जगभरात पसरलेले आहे. मुगाला इंग्रजीत ग्रीन ग्राम या नावाने ओळखतात. त्याचे वैज्ञानिक नाव विग्ना रेडिएटा असे आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

‘ए’ आणि ‘बी’ व्हिटॅमिन्स, लोह, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या मुगाच्या हिरवे, पिवळे आणि काळे अशा तीन प्रकार आपल्या कडे आढळतात. साधारणपणे गुडघाभर उंचीच ही पीक दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत काढणीला येते.

द्विदल कडधान्य असलेल्या मुगाला भारतीय खाद्य संस्कृतीत आतोनात महत्व आहे. मूग हे एक सर्वाधिक पोषणयुक्त कडधान्य म्हणून गणले जाते. लोह व‌ कॅल्शियम सह मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, जस्त इत्यादि क्षारांचा साठा मुगात आढळतो.

मूग आहारातून सेवन केल्यास अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते. ह्रदयविकार, कर्करोग, मधुमेह 
आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात. मलावरोध आणि जुलाब अशा दोन्हीही स्थितीमध्ये मूग उपयोगी आहेत. तसेच कफ, पित्त, वात अशा विकारांवर मूग उपयुक्त आहेत.

मूग लोक आवडीने खातात (अन् गप्प का बसतात माहित नाही ????). मुगापासून विविध खाद्यपदार्थ तयार करून आस्वाद घेतात व उत्तम आरोग्य संभाळतात.
मुगापासून वरण, लाडू, खिचडी, पेंडपाला, पराठा, उसळ इत्यादी बनवलेले पदार्थ चटकदार लागतात. लहानपणापासून माझे आणि मुगाचे एकदम फक्कड संबंध जुळले आहे. मुगापासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांवर मी तुटून पडतो.

शालेय विद्यार्थी असतांना खरीपाच्या हंगामात दररोज खिसा भरून मूग खाल्ल्याची आठवणी मनात अद्याप ताज्या राहिल्या आहेत. आता निवृत्तोत्तर जीवन शेतात घालवतो आहे. सुदैवाने यावर्षी खरीपातील पाऊस जोरदार बरसल्यामुळे मुगाची पीक जोमात आली आहे. सध्या मी बहरलेल्या मुगाच्या पिकात स्वैर संचार करत मुगाच्या ओल्या शेंगा सोलून लाळग्रंथींना कमाल क्षमतेने उत्तेजित करतो आहे.

एका वेळी किलोभर तरी मूग गिळतो (अन् गप्प नाही बसत)… मूग गिळून गप्प बसणे हे लौकिकदृष्टय़ा चांगले असते. पण का म्हणून? कोणी सांगाल का?

डॉ. अरविंद कुंभार, (पक्षी व पर्यावरण अभ्यासक) अरविंदवन, तद्देवाडी, चडचण, विजयपूर, कर्नाटक.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here