कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे:शिक्षण क्षेत्रातील संत

0
258

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे:शिक्षण क्षेत्रातील संत

             कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी 1934 साली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या या संस्थेच्या आज अनेक शाखा आहेत, सुमारे दहा महाविध्यालंय 50 ते 60 शाळा आहेत. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांना केंद्रबिंदू मानून स्थापन झालेल्या या संस्थेतील असंख्य विध्यार्थी आज जगातील वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत.


                मामा स्वतः शेतकरी होते. ते आजन्म वारकरी होते, पण टाळ मृदंगाच्या तालावर पंढरीची वारी करण्यापेक्षा संत तुकारामांनी सांगितलेल्या

आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने।शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू।। या विचारांचे त्यांनी पालन केले. त्यांनी स्वतःची संपत्ती संस्थेला दान दिली. मामा सुरुवातीला कांही काळ बार्शी नगरपालिकेत अधिकारी होते. राजीनामा देऊन मिळालेला पैसा गरिबांच्या शिक्षणासाठी दिला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
               मामा स्वतः संस्थेच्या शिवाजी बोर्डिंगमध्ये राहत. मुलांसोबत जेवत.जे बोर्डिंगमधील मुलांना जेवण असे तेच जेवण मामा जेवत. पंक्तीभेद मामाला आवडत नसे. मामांनी गावोगावी जाऊन मुलं आणि धान्य गोळा केले. घेणारे हात स्वच्छ असले की देणारे लाखो हात पुढे येतात, हे दोन कर्मवीरांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. कर्मवीर भाऊराव पाटील आणि कर्मवीर जगदाळे मामा!

              श्री. शिवाजी कॉलेज, जिजामाता विध्यामंदिर, म. फुले विध्यालय, राजर्षी शाहू लॉ कॉलेज, शंकरराव निंबाळकर डी. एड., कॉलेज ,संत तुकाराम विध्यालय, महाराष्ट्र विध्यालय इत्यादी शाखातून ज्ञानदानाचे काम चालते. क्रान्तीसिंह नाना पाटील यांनी इमारतीचे भूमिपूजन केले होते. मामांनी त्यांना स्वातंत्र्यचळवळीत खूप मोठी साथ दिलेली होती. मामा पुरोगामी विचारांचे होते. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचा आग्रह होता. 

                मामांना शिवरायांबद्धल खूप अभिमान वाटे. त्यांनी शिवरायांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा संस्थेच्या प्रांगणात उभारला आहे. मामांनी शिवरायांची प्रेरणा तरूणाना आधुनिक विचार आणि आधुनिक शिक्षण दिले.

            गरिबांसाठी अत्याधुनिक हॉस्पिटल असावे, ही त्यांची इच्छा होती. ते स्वप्न त्यांनी अविरत कष्टाने पूर्णत्वास नेले. बोर्डिंगमधील विध्यार्थ्यानी श्रमदानातून इमारत उभारली. बार्शीत आज अत्याधुनिक आणि स्वस्त असे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल उभ आहे. एखाद्या उपचारासाठी पुण्यात एक लाख रुपये खर्च येत असेल, तर या हॉस्पिटलमध्ये फक्त वीस हजार रुपये खर्च येतो. मामांच्या विचाराने कामकाज चालते.

              मामांच्या छत्रछायेखाली वाढलेली मुलं नावारूपाला आली. डॉ. बी. वाय यादव ,डॉ सी. बी. शितोळे, दिवंगत आमदार प्रा. शैलजाताई शितोळे, डॉ. गुलाबराव पाटील, वायूपुत्र नारायणराव जगदाळे इत्यादी ही कांही उदाहरणं आहेत. मामांच्या या अलौकिक कार्याबद्धल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विध्यापीठाने त्यांना डि.लीट. पदवी देऊन सन्मानित केले.

             कर्मवीर डॉ. जगदाळे मामा यांना जनता आदराने मामा म्हणते. मामा हे भाच्याला लाडाने वागवतात तसेच ते त्यांची योग्य जडणघडण करण्यासाठी कटिबद्ध असतात. मामा हे सर्वांचे मामा होते. मामा शिक्षण क्षेत्रातील संत होते. अशा त्यागी,पुरोगामी महामानवाच्या संस्थेचा मीही विध्यार्थी आहे, याचा मला अभिमान वाटतो. मामांची आज जयंती.जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

-डॉ.श्रीमंत कोकाटे

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here