करमाळ्याचा पोलिस लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात –
करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस स्टेशनमधील एका पोलिसाला बुधवारी (ता. १३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या संबंधित पोलिसाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. शशिकांत तुकाराम वाळेकर ( वय ४९, रा. शेलगाव, ता. करमाळा) असे त्याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर विभागाचे पोलिस उप अधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या पत्नीला गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस नाईक वाळेकर यांनी यांच्याकडे १० हजराराची मागणी केली होती. पहिला पहिला टप्पा म्हणून ७००0 रुपये स्वीकारताना वाळेकर याना सापळा रचून पकडले आहे.

तक्रारदार व त्यांची पत्नी, मुलगा याच्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात पोलिसाने तक्रारदाराला लाच मागितली होती. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला संपर्क साधला. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून लाच स्वीकारताना पकडले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अॅंटी करपशन ब्यूरोचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, शिरिशकुमार सोनवणे, प्रमोद पकाले, अतुल घाडगे, यांनी ही कारवाई केली आहे