बार्शी : काळेगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ. राजेंद्र राऊत गटाच्या बळीराजा सहकारी विकास आघाडीने विरोधकांचा तेरा विरूद्ध शून्य फरकाने पराभव करून दणदणीत विजय मिळविला. मतदान प्रक्रियेतून झालेल्या १२ जागांवर विजय मिळवित व मतदान पूर्वी १ जागेवर बिनविरोध विजय मिळवित एकूण तेरा जागांवर प्रस्थापितांच्या विरोधात निर्विवाद वर्चस्व मिळविले.
माजी आ. कै. चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या आशीर्वादाने व आ. राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विनायक आबा देशमुख, दासभाऊ घायतिडक, नेताजी घायतिडक, सरपंच आप्पासाहेब घायतिडक, अरुण घायतिडक, विजयसिंह देशमुख, विक्रम घायतिडक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली.

या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून अरुण घायतिडक, दौलतराव घायतिडक, नरसिंह घायतिडक, संजयकुमार घायतिडक, शंकर घायतिडक,आप्पासाहेब काळे, रामचंद्र काळे, श्रीधर काळे, महिला सर्वसाधारण गटातून सौ. रंजना घायतिडक, सौ. सुदामती वाघमारे, इतर मागास प्रवर्गातून महादेव नांगरे, अनुसूचित जाती जमाती गटातून शामराव मस्तुद, नारायण गोसावी हे तेरा उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले.
या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचा, आ. राजेंद्र राऊत यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी माजी जि.प.सदस्य संतोष दादा निंबाळकर, बाबासाहेब मोरे, सचिन मडके उपस्थित होते.