कही खुशी कही गम: बार्शी तालुक्यात मंगळवारी ८० रूग्णांनी केली कोरोनावर मात ; ४७ बाधित रूग्णाची वाढ,दोन मृत्यू
एकूण रुग्णसंख्या १११७ वर
बार्शी : बार्शी शहरासह तालुक्यातील कोरोनाचा विळखा वाढत असलातरी यात बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत ही वाढ होत आहे .आज ८० रुग्णांनी कोरोनावर मात करत घरी परतले आहे .तर आजवर एकुण बाधित रग्णांपैकी ६२५ जणांनी कोरोनावर मात केली आहे .


बार्शी शहर व तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमध्ये सुखद बातमी आली मंगळवार दि . ४ ऑगस्ट आजच्या अहवालात ४७ रुग्ण वाढले असले तरी ८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे . एकुण बाधितांची संख्या १११७ झाली असली तरी यात ६२५ रुग्णांनी कोरानावर विजय मिळवला आहे . यामुळे शहरातील ३०५ व ग्रामिण मधील १४७ रुग्ण असे सध्या एकुण ४५२ रुग्णावर उपचार सुरू आहेत.
आज शहरातील कासारवाडी १, वाणी प्लॉट २,
पंकजनगर ३ ,नेटके प्लॉट २ ,सोलापुर रोड १,
लहुजी चौक ३, पाटील चाळ १, बेदराई गल्ली १, बुरुड गल्ली ३, उपळाई रोड १, सुभाष नगर १, आडवा रस्ता १, पराग इस्टेट २, आझाद चौक १,
फुले प्लॉट २, भराडीया प्लॉट १, वाणी गल्ली १, भिसे प्लॉट १, सन्मित्र हौ सोसायटी १ असे २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

तर ग्रामिण मध्ये वैराग ४ आगळगाव १,
उपळे दु २ ,रातंजन २, भोयरे २, उंबरगे १,
खामगाव ५, घारी १ असे १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आजच्या अहवालात दोन जणांचा मृत्यु झाला असल्याने एकुण ४० मयतांची नोंद झाली आहे .