अज्ञात कारणावरून तरुणाची आत्महत्या
बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) नवनाथ दत्तात्रय रोडे वय ३० वर्षे रा पंकज नगर बार्शी या तरुणाने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

अधिक माहिती अशी की मयत नवनाथ हा बार्शीतील चांडक कारखान्यात कामाला होता दि ६ रोजी दुपारी एक वाजता जेवण करून कामाला जातो असे सांगून घराबाहेर गेला मात्र रात्री आठ वाजता तो कामावरून घरी आला नाही म्हणून कारखान्यात विचारपूस केली असता तो दुपारी बारा नंतर कामाला आला नसल्याचे सांगितले म्हणून त्याच्या मित्राकडे चौकशी केली मात्र तो कुठे ही मिळून आला नाही.
म्हणून वडिलांनी त्यांच्या जुन्या घरी जाऊन बघितले तर घराचा दरवाजा उघडा दिसला म्हणून आत जाऊन बघितले असता घराच्या पत्र्याच्या अँगल ला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात रीतसर खबर देण्यात आली आहे आज सकाळी शवविच्छेदना नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले मयत नवनाथला सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षात खूप मोठा मित्र परिवार होता त्यामुळे आज त्याच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे त्याच्या पश्चात आई वडील,पत्नी दोन मुले आणि बहिणी असा परिवार आहे.
मयत नवनाथ हा नायलॉन रस्सी तयार होणाऱ्या चांडक कारखान्यात कामाला होता आणि आज त्याच नायलॉन रस्सीने स्वतःचा जीव गमावला आहे त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.