जम्मू-काश्मीर: शोपियातील चकमकीत ४ अतिरेकी ठार

0
386

जम्मू-काश्मीर: शोपियातील चकमकीत ४ अतिरेकी ठार

श्रीनगर, १८ जुलै : कोरोनाच्या संकटकाळातही जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानपुरस्कृत अतिरेकी कारवाया सुरूच आहेत. त्यात आज शोपियातील अमशीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या जोरदार चकमकीत ४ अतिरेकी ठार झाले आहेत. या ठिकाणी अद्याप चकमक सुरूच आहे, असे जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी सांगितले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील अमशीपोरा भागातील एका घरात काही अतिरेकी दडले असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आज सकाळी या घराला वेढा घातला. त्यावेळी घरात दडून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्यात ४ अतिरेकी ठार झाले. त्यांची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काल कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

सांगण्यात येत आहे की, गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा या भागात कार्यवाही सुरू केली. चकमक सुरू होण्यापूर्वी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना शरण जाण्याची संधी दिली होती. परंतु त्यांनी शरण न जाता गोळीबार करण्यास सुरूवात केली.

दरम्याम, काश्मीरचे जिल्हे एकामागून एक दहशतवाद्यांपासून मुक्त होत असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना आपले अस्तित्व वाचवण्यासाठी मोठा लढा देत असून सुरक्षा दलाने यंदाच्या वर्षी १३७ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here