बार्शीतील व इतर ठिकाणी दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीस अटक करून पाच लाख, 56 हजार ,पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी.

बार्शी: बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गु.र.र नंबर 517/2021,भा. द.वी.कलम 454,457,380 , असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते .

स्थानिक गुन्हे शाखा कडील पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने गुन्हा घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासादरम्यान भोसले चौक येथे पेट्रोलिंग करत असता परभणी येथील दोन इसम पांढऱ्या रंगाची इंडिका विस्टा सहित मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली असता ,त्यांनी सांगितले की त्यांनी मागील महिन्यात बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटल जवळ त्यांच्या ताब्यातील इंडीका विस्टा गाडी नेऊन दिवसा घरफोडी करून त्यामधील मिळालेले सोने विक्रीसाठी घेऊन जात आहोत.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचेकडे गुन्ह्यात चोरीस गेलेल्या ऐवजपैकी 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले. यांनी चोरी केल्याची खात्री झाल्याने ,विवो कंपनीचा मोबाईल गुन्ह्यात वापरलेली कार व सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख 56 हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करून आरोपी नंबर (१)खय्युम रफिक बेग/ शेख वय 19 राहणार संजय गांधी नगर परभणी(2) अमीर उर्फ अजजू मुखबिर खान वय 23 रा.संजय गांधी नगर परभणी यांना अटक करून धडाकेबाज कारवाई केली आहे.