LIC च्या वर्धापनदिनानिमित्त बार्शीत विमा जनजागृती रॅली

0
114

LIC च्या वर्धापनदिनानिमित्त बार्शीत विमा जनजागृती रॅली
बार्शी : भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC ) च्या महा ६७ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने शहरातून विमा जनजागृती रॅली काढण्यात आली होती.

सकाळी ९ वाजता नगर परिषद समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून सुरु होऊन विमा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून अगळगाव रोडवरील LIC ऑफिस बार्शी येथे दाखल झाली. रॅलीचे उदघाटन भारतीय बार्शी शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी तुषार घाटगे यांचे हस्ते व सांगता वरिष्ठ सहाय्यक लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते झाली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

विकास अधिकारी उन्मेष पोतदार म्हणाले की “अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे विमा ही सर्वांची मूलभूत आर्थिक गरज आहे.आणि विमा जनजागृती हाच या रॅली मागचा उद्देश आहे.” रॅली मध्ये महिला विमा एजंट देखील बहुसंख्येने सामील होऊन त्यांचा घोषणा देण्यात सुध्दा विशेष पुढाकार होता.

विमा रॅली यशस्वी होण्यासाठी विमा प्रतिनिधी मारुती मोरे व कीर्ती कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here