घरोघरी पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना
सोलापूर : पर्यावरण चा ढासळत असलेला समतोल लक्षात घेता या वर्षी पर्यावरणपूरक असे इको फ्रेंडली गणपतीची प्रतिष्ठापना घरोघरी करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील डॉक्टर मोनिका जिंदे यांनी पहिल्यांदाच स्वतः असा गणपती तयार केला अाहे. याशिवाय छोटशी सजावट करून ‘झाडे लावा झाडे जगवा’ याचा संदेश देण्याचा प्रयन्त केला.


घरी तयार करण्यात आलेला गणपती मातीचा असून तो तासाभरात विरघळतो. आणि तीच माती झाडांसाठी वापरता येणार अाहे. हा पर्यावरण पूरक बाप्पा वसलाय एका नैसर्गिक अधिवासात ज्यात प्लास्टिक व्यतिरिक्त सर्व टाकाऊ वस्तूचा वापर करून बाप्पाच्या समोर निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
या इको फ्रेंडली गणपतीसाठी पर्यावरणपूरक मखर देखील तयार करण्यात आला आहे. आपण जितकं पर्यावरणचा ऱ्हास करू तितकंच आपले जीवन त्रासदायक होणार आहे. यासाठी पर्यावरण संवर्धनाची सुरुवात आपल्यापासून करव्यात अशी भावना डॉ. मोनिका सुरेश जिंदे यांनी व्यक्त केली आहे.
