Big Breaking: टिकटॉक युसी ब्राऊजरसह ५९ चिनी अँपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

0
366

केंद्राचा दणका: टिकटॉक युसी ब्राऊजरसह ५९ चिनी अँपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली, २९ जून : पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अँपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

भारत-चीन वादानंतर भारतातून या अॅपवर बंदी घालण्याची मागणी वाढली होती. चिनी App वर बंदी घालण्यासाठी सोशल मीडियावर देखील जोरदार मागणी होत होती. अखेर आज सरकारने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मोठा निर्णय घेतला आहे.

देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल अॅप्स आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारने निवेदन जारी केलं आहे. मालवेअर आणि शंकास्पद अॅप्सची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ही अॅप्स डाऊनलोड करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

ही आहेत ती बंदी घातलेली ऍप्स

TikTok,Shareit, Kwai,UC Browser,Baidu map, Shein,Clash of Kings, DU battery saver, Hello, Likee, YouCam makeup,Mi Community, CM Browers, Virus Cleaner,APUS Browser, ROMWE, Club Factory, Newsdog, Beutry Plus, WeChat,UC News,QQ Mail, Weibo, Xender, QQ Music,QQ Newsfeed, Bigo Live, SelfieCity,Mail

Master,Parallel Space ,My Video Call Xiaomi, WeSync, ES File Explorer,Viva Video – QU Video Inc,Meitu,Vigo Video, New Video Status, DU Recorder,Vault- Hide,Cache Cleaner DU App studio,DU Cleaner,DU Browser Hago Play With New Friends, Cam Scanner, Clean Master – Cheetah Mobile ​​Wonder Camera, Photo Wonder,QQ Player, We Meet,Sweet Selfie,Baidu Translate,Vmate QQ International, QQ Security

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here