भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर, सोलापूरच्या किरण नवगिरेची निवड
सोलापूर : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. महिला टी-20 चॅलेंजमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सोलापूरच्या किरण नवगिरेचा प्रथमच टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. किरण नवगिरेचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला.

सोलापूर जिल्ह्यातील किरण प्रभू नवगिरेची भारतीय महिला क्रिकेट संघात ट्वेंटी-ट्वेंटी संघात इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालीय. सोलापूर जिल्ह्यातील मिरे, श्रीपूर अकलूजसह सोलापूर जिल्ह्यात किरण नवगिरे हिचे निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.
अनघा देशपांडे नंतर भारतीय संघात स्थान मिळवणारी किरण नवगीरे सोलापूरची दुसरी खेळाडू आहे.


महिला खेळाडू संघ जाहीर झाला आहे. हरमनप्रीत कौर (कप्तान), स्मृति मंधाना (वीसी), शैफाली वर्मा, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रोड्रिग्स, स्नेह राणा, रेणुका सिंह, मेघना सिंह, राधा यादव, एस मेघना, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वरी गायकवाड़, दयालन हेमलता, सिमरन दिल, बहादुर, ऋचा घोष आणि सोलापूरची किरण प्रभु नवगीरे असे नावे आहेत.
प्रतिकूल परिस्थितीतून श्रीपूरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिकत विविध क्रीडा स्पर्धा गाजवत पुढे पुणे विद्यापिठाच्या महिला क्रिकेट संघ, तसेच नागालँड, अरुणाचल प्रदेश कडून खेळत सराव, सातत्य यातून भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे. मिरे सारख्या अतिशय लहानशा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या किरण प्रभु नवगिरे ही पहिल्यापासून विविध खेळात पारंगत होती. मात्र तिचा विशेष ओढा कायमच क्रिकेटकडे राहिला होता. आता सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी तिला भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे.