बार्शीसाठी स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोग शाळा करा- आमदार राजेंद्र राऊत यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

बार्शी: बार्शी शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता बार्शीत स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोगशाळेस मंजुरी मिळावी यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली आहे.

सध्या कोरोना रुग्णांची तपासणीकरणेसाठी त्यांचे स्वॅब सोलापूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. सोलापूर शहर व सोलापूर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्ण संख्येमुळे सोलापूर येथील कोरोना तपासणी प्रयोग शाळेवरजास्त प्रामाणात ताण पडत आहे. तपासणी अहवाल येण्यास विलंब होत आहे.

सोलापूर येथील कोरोनातपासणी प्रयोगशाळेवरील ताण कमी करण्यासाठी व रुग्णांचे अहवाल लवकर प्राप्त होणेसाठी बार्शीत स्वतंत्र कोरोना तपासणी प्रयोगशाळा झाल्यास सोलापूरचा ताण कमी होईल व त्याचा फायदा बार्शीसह माढा व करमाळा या तालुक्यास होईल असेही राऊत यांनी या निवेदनात म्हटले आहे.

या मागणीचे निवेदन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर यांच्याकडे तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांनी मागणी केली आहे. लवकरच या प्रयोगशाळेस मान्यता मिळेल अशी आशा त्यानी बोलून दाखवली.
