बार्शी तालुक्यात २५ कोरोना बाधितांची वाढ
तर दोन मयत, ३९ जणांना उपचारांनंतर सोडले घरी
बार्शी : शहर व तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असुन गुरुवार दि. ६ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवाला २५ बाधित रुग्ण वाढले असून दोन मयत झाले आहेत जमेची बाजु अशी की ३९ बाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे.

बार्शी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच असुन रुग्ण वाढीची साखळी तुटत नसल्याने शहरातील विविध भागात हळु हळु सर्वत्र पसरत आहे हि चिंतेची बाब आहे .

आज आलेल्या अहवालात स्वॅब व अँन्टीजनचे एकूण ३४६ अहवाल प्राप्त झाले आहे यापैकी शहरातील २५४ अहवाल प्राप्त झाले असुन २३८ अहवाल निगेटिव्ह आले तर १६ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले . शहरातील मंगळवार पेठ ३, सलगर गल्ली २ ,राऊत गल्ली ३ ,वाणी प्लॉट २ ,सोलापुर रोड १, भवानी पेठ १ ,जैन मंदीर जवळ १, फुले प्लॉट १, जावळी प्लॉट १, लक्ष्मीनगर १ असे १६ अहवाल पॉझिटिव्ह आले.

तर ग्रामिण भागातील ९२ अहवाल प्राप्त झाले असन यापैकी ८३ अहवाल निगेटिव्ह आले . यापैकी शेळगाव (आर ) ३, चिंचोली १, मळेगाव १, घारी २, धामणगांव दु १, उंबरगे १ असे ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता बार्शी शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या ११६१ वर पोहचला आहे .
परंतु गेल्या काही दिवसात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने आज ३९ जणांना उपचारानंतर घरी सोडले असल्याने आजवर ७१८ जणांना घरी सोड्ले आहे तर ३९९ जणांवर उपचार सुरु आहेत . तर आजच्या अहवालात दोन मयतांची नोंद झाल्याने एकुण मयताची संख्या ४४ झाली आहे . तर सदया शहरासह तालुक्यात आयएल आयचे ११४ तर सारीचे ८ रुग्ण आहेत
.
