माणुसकीला काळीमा फासणारी घटना ; मुलाने केला आईचाच खून ,बार्शीतील घटना
बार्शी :- जन्मदात्या मुलानेच झोपलेल्या ठिकाणीच आईच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन करून मृतदेह गादीवरून ओढत घराबाहेर आणून झुडपात टाकुन देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना आज दि.12 मंगळवारी सकाळी बार्शीत उघडकीस आली.

रुक्मिणी नागनाथ फावडे वय 45 रा.वाणी प्लाॅट बार्शी असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.
श्रीराम नागनाथ फावडे वय 21 असे आईचा निर्घुण खुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.
पो.हवालदार अरुण माळी यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आज सकाळी 08: 20 च्या सुमारास पोलीस कर्मचारी घोडके यांनी त्यांना फोन करुन सांगितले की, वाणी प्लॉट येथिल शिंदे यांच्या घरी फावडे राहत आहेत. त्यांच्या घराच्या कपाऊंड मध्ये एका प्लास्टीक कागदामध्ये महीलेची डेडबॉडी पडलेली आहे असे कळविले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी जावुन पाहीले असता शिंदे यांच्या घराच्या कपाऊंड मध्ये एका महीला मयत अवस्थेत झुडपामध्ये पडलेली दिसली. मृतदेह रुक्मिणी नागनाथ फावडे वय 45 वर्षे रा वाणी प्लॉट बार्शी हिचाच असल्याचे तिच्या पतीने सांगितले.
मयत महीला रुक्मिणी व तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे वय 21 वर्षे हे दोघेजण सदर ठिकाणी राहत होते. व लहान मुलगा व पती हे नेहमी भांडण होत असल्याने बार्शी शहरातील डंबरे गल्ली येथे वेगळे राहत होते. तसेच मोठा मुलगा व मयत रुक्मिणी यांच्यात पैशा वरुन नेहमी वाद होत होते. त्या बाबत पोलीस स्टेशनला तक्रारी ही दाखल होत्या
मयत महिलेचे पती नागनाथ फावडे व त्यांचा लहाण मुलगा लक्ष्मण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेस्टस वरुन समजले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व वापरते कपडे त्याने नेल्याचे लक्षात आल्याने, व यापुर्वी ही त्याने आईस व भावास मारहाण केल्याने सदर महीला रुक्मिणी वय 45 वर्षे हीस तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे यानेच त्याची आई मयत रुक्मिनी फावडे हीचा डोक्यात दगड घालुन जिवे ठार मारले असा संशय आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल हिरे, पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान संशईत आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई येथे पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके हे करत आहेत.