बार्शीत छत्रपती चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

0
35

बार्शीत छत्रपती चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

राज विजय क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजन, ६४ संघांचा सहभाग

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

प्रतिनिधी | बार्शी

छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर जगदाळे मामा यांच्या जयंतीनिमित्त येथील राज विजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या छत्रपती चषक राज्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बार्शीतील भगवंत मैदानावर होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे व शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले.

प्रारंभी छत्रपती शिवराय, कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या तसेच भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी नगरसेवक विजय राऊत, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, माजी झेडपी सदस्य संजयपाटील,माजी उपसभापती प्रमोद वाघमोडे,दिलीप मोहिते, भारत पवार, कुंडलिक गायकवाड,संतोष निंबाळकर, विलास रेणके, प्रशांत कथले, बाबा मोरे, सुधीर बरबोले,सचिन मडके, दिपक राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी आ राऊत म्हणाले, नगरपालिकेच्या माध्यमातून या स्टेडियमची उभारणी झाली. दरवर्षी छत्रपती चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते मात्र मागील दोन वर्षात कोरोनामुळे यात खंड पडला होता. यंदा या स्पर्धा होत असून ६४ संघांनी सहभाग घेतला आहे. क्रीडाप्रेमींना यातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेट बरोबरच अन्य खेळांच्या स्पर्धांचेही आयोजन करण्याचा यापुढील काळात प्रयत्न राहील. शहरात गाडेगाव रोड भागात आणखी एक क्रीडांगण करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मिरगणे यांनी तर सामन्याचे धावते समालोचन मिलींद ताकपिरे यांनी केले.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघास आ. राजाभाऊ राऊत मित्रमंडळाच्यावतीने १ लाख ७१ हजार रु, व फिरता चषक, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या संघास राज विजय क्रीडा मंडळाच्यावतीने १ लाख ११ हजार रु व चषक, तृतीय क्रमांकाच्या संघास ७१ हजार रु व चषक असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व सामनावीर यासाठी प्रत्येकी ११ हजार रु बक्षीस ठेवण्यात आले आहे. मालिकावीरास साई होंडा व राज विजय क्रीडा मंडळाच्यावतीने बाईक देवून गौरविण्यात येणार आहे.

प्रदर्शनीय सामन्यात राहुल शेलारची उत्तुंग फटकेबाजी

उदघाटनांतर रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखालील आरसीसी क्रिकेट क्लब व आरसीसी मध्ये पूर्वी खेळलेल्या जेष्ठ खेळाडूंचा भगवंत संघ यांच्यात प्रदर्शनीय सामना झाला. रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखालील संघातील राहुल शेलार या फलंदाजाने भगवंत मैदानावर चौकार षटकारांची बरसात केली. त्याने ८ षटकांच्या सामन्यात वैयक्तिक नाबाद ९२ धावा केल्या. तर संघाच्या ११२ धावा झाल्या. जेष्ठ खेळाडूंच्या संघातील युवराज ढगे व बबलू दिडवळ यांनी संघाला सन्मानजनक धावापर्यंत नेले. भगवंत संघाच्या निर्धारित षटकात ९० धावाच झाल्या.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here