सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात आज 241 पॉझिटिव्ह तर 2772 निगेटिव्ह ; पाच जणांचा  मृत्यू

0
722

सोलापुर – आज दि.13 ऑगस्ट गुरूवारी मिळालेल्या माहिती नुसार 12 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण विविध गावात व नगर पालिका क्षेत्रात सोलापूर महानगर पालिका क्षेत्र वगळून एकूण 55100 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये 54984 जणांचा अहवाल प्राप्त झाले आहेत.

आज पॉझिटिव्ह रुग्ण हे 241 आढळले असून एकूण 48213 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे आणि 116 जणांचा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे.आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 161 आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उपचारादरम्यान आजपर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे आणि कोरोना वर मात करून बरे होऊन आपल्या घरी 2728 रुग्ण गेलेले आहेत आणि रुग्णालयात दाखल असलेले बधितांची संख्या 3850 आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6772 इतकी झाली आहे. यामध्ये 4071 पुरुष तर 2701 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 194 जणांचा मृत्यू झाला आहे यात 135 पुरुष तर 59 महिलांचा समावेश होतो.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2728 आहे .यामध्ये 1672 पुरुष 1056 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 3850 यामध्ये 2264 पुरुष तर 1586 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट 3 बार्शी 38 करमाळा 06 माढा 19 माळशिरस 8 मंगळवेढा 15 मोहोळ 15 उत्तर सोलापूर 23 पंढरपूर 101 सांगोला 9 दक्षिण सोलापूर 4असे एकूण 241पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

अक्कलकोट 1 ,करमाळा 1 ,मोहोळ 1 ,पंढरपूर 1 ,माळशिरस 1 मधील एक व्यक्ती मरण पावली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here