सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज मंगळवारी ग्रामीण भागातील तब्बल 311 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 219 पुरुष तर 92 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 103 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1213 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 902 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 27 इतकी झाली आहे. यामध्ये 6 हजार 90 पुरुष तर 3 हजार 937 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 283 जणांचा मृत्यू झाला आहे यात 196 पुरुष तर 87 महिलांचा समावेश होतो .

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 797 आहे .यामध्ये 1 हजार 862 पुरुष तर 935 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 6 हजार 947 यामध्ये 4032 पुरुष तर 2915 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट 14 बार्शी 16 करमाळा 30 माढा 49 माळशिरस 79 मंगळवेढा 7 मोहोळ 14 उत्तर सोलापूर 0 पंढरपूर 33 सांगोला 7 दक्षिण सोलापूर 62 असे एकूण 311 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.