सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये गुरुवारी 411 रुग्ण वाढले, 608 जण झाले कोरोनामुक्त ; बार्शीत सर्वाधिक रुग्ण

0
748

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) गुरूवारी 1 आँक्टोबर रोजी एकूण 411 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित बार्शी तालुक्यात 110 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 608 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरूवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 9 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 25435 इतकी झाली असून यापैकी 18677 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6070 जणांवर उपचार सुरू आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज 608 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 688 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 9 जण मयत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here