सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा काहीसा कमी झालेला संसर्ग पुन्हा वाढत असल्याने चित्र दिसू लागले आहे. आज (रविवारी) 469 संशयितांची टेस्ट करण्यात आली. त्यात 78 पॉझिटिव्ह सापडले असून हत्तुरे वस्तीतील 72 वर्षीय महिला, विजयपूर रोडवरील इंदिरा नगरातील 56 वर्षीय पुरुष आणि सावली सोसायटी (इंदिरा नगर) येथील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आज होमकर नगर (भवानी पेठ), आदित्य नगर, इंदिरा नगर, डीसीसी बॅंक कॉलनी, तात्या पार्क, देशमुख नगर, सुंदरम नगर (विजापूर रोड), शेळगी, मल्लिकार्जुन नगर, गुरुनानक नगर, मुरारजी पेठ, पाने सोसायटी, बेगम पेठ, सुशिल नगर, भवानी पेठ, कलासंगम अपार्टमेंट, आकाश नगर, गणेश नगर (बाळे), चौगुले पार्क, शंकर नगर (होटगी रोड), सहवास नगर, सिटीझन पार्क, करुणा सोसायटी, महालक्ष्मी नगर (मजरेवाडी),

सिध्देश्वर नगर (नई जिंदगी), गायत्री नगर, पीडब्ल्यूडी क्वार्टर (सिव्हिल लाईन), उत्तर कसबा, बिलाल नगर, मुद्रासन सिटी, गीता नगर, अरविंदधाम (निराळे वस्ती), मंत्री चंडक नगर, रेल्वे लाईन, शेटे नगर, सिध्देश्वर नगर, शिवयोगी नगर, दत्त नगर (जुळे सोलापूर), पश्चिम मंगळवार पेठ, जोशी गल्ली, पद्मा नगर, जोशी गल्ली, गोल्डफिंच पेठ, उमा नगरी, रविवार पेठ, दक्षिण बसका, जोडभावी पेठ या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.
