बार्शी: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सलग दुसऱ्या बार्शी शहर व तालुक्यात अवकाळीपावसाने हजेरी लावली.आज सोमवारी दि.12 दुपारच्या सुमारास बार्शी तालुक्याच्या पुर्व भागातील गावात वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली.दरम्यान जामगाव (आ) येथील हरीदास रामलिंग खांडेकर यांच्या मालकीचे दोन बैल विज अंगावर पडल्यामुळे मयत झाले.त्यांनी शेतातील गट नं – 22/2 मध्ये सदर बैल बांधले होते.

वादळी वा-यामुळे ठिकठिकाणी घरावरील पत्रे उडुन गेले.पांगरी, घारी ,पाथरी ,चारे भागातील शेतक-यांच्या अंब्याचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली.गुढी पाडव्याच्या सनामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली.

तालुक्यातील कांही गावात शाळेवरील पत्रे उडुन गेल्यामुळे शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळी वा-याने आंबा पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच उभ्या असलेल्या ज्वारी,काढुण टाकण्यात आलेल्या कांदा,हरभरा, पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.