बार्शी तालुक्यात १८७५ पैकी १६३१ कोरोना रुग्ण झाले बरे ,केवळ १६३ रुग्णावरच उपचार सुरु

0
629

बार्शी तालुक्यात १८७५ पैकी १६३१ कोरोना रुग्ण झाले बरे ,केवळ १६३ रुग्णावरच उपचार सुरु

आत्तापर्यत ८१ जणांचा मृत्यु

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

 तर दोन दिवसात ३८  रुग्णांची भर
 

गणेश भोळे

बार्शी : बार्शी शहर तालुक्यात जवळपास सर्वत्र कोरोना बाधितांची संख्याची ज्या झपाट्याने वाढत आहे त्याच वेगानेही रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे सोमवार दि २४ ऑगस्ट रोजी १८  कोरोना बाधीत तर मंगळवार दि . २ ऑगस्ट रोजी २०  रुग्णांची भर पडुन बार्शी तालुक्यात कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १८८१  झाली आहे.  यापैकी १६३१  रुग्ण बरे झाले तर सध्या कोविड केअर सेंटर आणि विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये  १६३  रुग्णांवरच उपचार सुरु आहेत. सोमवारी एक तर मंगळवार दोन जणांचा मृत्यू झाला आहे .

बार्शी शहर व तालुक्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात आरटी पी सी १३ तसेच रॅपीड अॅन्टीजन २३ टेस्ट केलेल्या रुग्णांचा आलेल्या अहवालात गाडेगाव रोड १, वाचकुळे प्लॉट १, भराडीया प्लॉट १, कासारवाडी रोड ३,  सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १ ,राऊळ गल्ली १, बारबोले प्लॉट १ असे १०  रुग्ण पॉझिटिव्ह तर एक मयताची नोंद झाली आहे. तर ग्रमीण मध्ये वैराग घोळवेवाडी रुई गुळपोळी धामणगाव हळदुगे कासारवाडी उंबरगे असे प्रत्येकी १ असे  ८ जण रुग्ण पॉझिटिव निघाले आहेत

तर शहरात मंगळवार रोजी प्राप्त ५३ अहवालात १३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे

नागणे प्लॉट १, कासारवाडी रोड १, अलिपुर रोड १, आगळगाव रोड १, मंगळवार पेठ ३, सिद्धेश्वर नगर १, सनगर गल्ली १, चाटे गल्ली १, जैन मंदीर जवळ १, भीम नगर १, असे १३ तर ग्रामिण मध्ये वैराग १ उक्कडगाव १ उपळे दु २ बावी आ २ ,सौदरे १ असे ७ रुण पॉझीटीव्ह तर २ रुग्णांचा मृत्यु झाला आहे .

_________________

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here