बार्शी तालुक्यात ४४ कोरोना बाधित रुग्ण वाढले
गणेश भोळे
बार्शी शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्येत वाढ सुरुच असुन दि. १७ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ४४ रुग्णांची वाढ तर एक मयतची नोंद झाली आहे.


बार्शी तालुक्यात २४५ अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये ४४ नव्याने रुग्ण सापडले आहे बार्शी शहरातील दत्तनगर १, गाडेगाव रोड २, चाटे गल्ली १, ज्ञानेश्वर मठ २, दत्त बोळ १, बारबोले प्लॉट २, पाटील प्लॉट ३, सोलापुर रोड ३, नाईकवाडी प्लॉट १, धर्माधिकारी प्लॉट १, भवानी पेठ १, देवणे गल्ली १, वाणी प्लॉट १, सनगर गल्ली १, लोखंड गल्ली १ असे २२ शहरात कोरोनाची बाधा असलेले रुग्ण आढळले तर ग्रामिणमधे कोरफळे ७, वैराग ३, श्रीपत पिपरी १, चारे ३, धामणगाव १, खामगाव १, पानगाव १, पांगरी ३ महागाव २ ,असे २२ ग्रामिण मध्ये रुग्ण आढळले आहे
तर आज अहवालात एक मयतची नोंद झाली आहे .

यामुळे आजवर एकुण बाधित रुग्ण संख्या १६०४ झाली असली तरी यापैकी गेल्या काही दिवसात रुग्ण उपचारांनंतर बरे होण्याचे प्रमाणही वाढले असुन ११४२ जणांना घरी सोडले आहे . तर सदया ४०६ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत . आणि आजवर ५६ जणांचा मृत्यु झाला आहे .