बार्शी तालुक्यात दोन दिवसात 156 नवे कोरोना बाधित रुग्ण ;तर 10 जणांचा मृत्यू 263 जण झाले बरे
बार्शी: बार्शी शहर व तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ सुरूच आहे.विशेषतः गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात 156 कोरोना रुग्णांची वाढ नोंदवली गेली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 263 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत.तर दुसरीकडे दहा जणांचा मृत्यू झाला ही चिंतेची बाब आहे.


यामध्ये बार्शी शहरात 42 तर ग्रामीण भागात 118 रुग्ण आहेत. अशी माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक ढगे यांनी दिली. दोन दिवसात 1393 जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे.
शहरात 238 तर ग्रामीण भागात 855 जणांच्या चाचणी करण्यात आल्या. बार्शीत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट रुग्णांची संख्या ही जास्त आहे.आता देडिकेटेड कोविड सेन्टर आणि हॉस्पिटल ची संख्या देखील वाढली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये एच आर सिटी स्कोअर जास्त आढळून येत आहे. तसेच गेल्या काही दिवसात मृत्यू ची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे.रुग्ण संख्या घटलेली दिसत असली तरी चाचण्यांचे प्रमाण ही निम्म्याहून कमी झाले आहे. रॅपिड अँटिजेंन किट चा ही तुटवडा झाला आहे. रेमडीसीविर इंजेक्शन देखील मिळत नाहीत.