बार्शी तालुक्‍यात दोन दिवसांत 138 कोरोनाबाधित रुग्णांची भर ; आठ जणांचा मृत्यू 

0
657

बार्शी तालुक्‍यात दोन दिवसांत 138 कोरोनाबाधित रुग्णांची भर ; आठ जणांचा मृत्यू 


बार्शी  ः  बार्शी शहर बसू तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार अन्‌ बुधवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 661 तपासणी अहवालामध्ये  तब्बल138 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये शहरातील 92 तर ग्रामीण मधील 46 जण आहेत.बाधितांची संख्या 4 हजार 211 झाली आहे.बरे होऊन 3 हजार 276 जण घरी गेले आहेत.141 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी  अमिता दगडे-पाटील यांनी दिली. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शहरातील 477 व ग्रामीण मधील 134 असे 661 अहवाल प्राप्त झाले.शहरातील 317 व ग्रामीण मधील 114 असे 431 जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.शहरातील 73 तर ग्रामीणमधील 68 अशा 141 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरातील 206 तर ग्रामीणमध्ये 157 अशा 363 जणांवर उपचार सुरु आहेत. 
शहरातील अलिपूररोड 9,नाईकवाडी प्लॉट 4,विठ्ठल नगर,देशमुख प्लॉट येथे प्रत्येकी 3,राऊत चाळ,बारंगुळे प्लॉट,सुभाषनगर,उपळाई रोड,मंगळवार पेठ,लोखंड गल्ली,पाटील प्लॉट,नागणे प्लॉट येथे प्रत्येकी दोन कोरोनाबाधित रुग्ण बुधवारी आढळले. 

राऊळ गल्ली,रोडगा रस्ता,सोलापूर रोड,दत्तनगर,कथले बोळ,फुले प्लॉट,तुळशीराम रोड,मांगडे चाळ,नलावडे प्लॉट,एकविराई चौक,कासारवाडी रोड,बागवान प्लॉट,पवार प्लॉट,लातूर रोड,कसबा पेठ,कुर्डुवाडी रोड येथे प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे.

ग्रामीण भागातील वैराग, आगळगाव, सासुरे, घोळवेवाडी, उपळाई ठोंगे, गुळपोळी, उक्कडगाव येथे प्रत्येकी दोन, चिखर्डे, पांगरी प्रत्येकी तीन, पिंपरी, खामगाव, खांडवी, जवळगाव, सौंदरे, तावडी येथील प्रत्येकी एक जण बाधित आढळला आहे. दोन दिवसांत शहरातील 385 तर ग्रामीणमधील 138 जण निगेटिव्ह आले आहेत.13 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे दगडे-पाटील यांनी सांगितले.  

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here