गृह विलगीकरणात ठेवलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई -मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील

0
638

गृह विलगीकरणात ठेवलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास  कारवाई -मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील 

बार्शी

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी शहरातील कोरोना प्रादुर्भावाने वाढती रुग्ण संख्या पहाता प्रत्येक बार्शीकरांनी कोरोना संसर्ग पासुन आपला बचाव करण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्याची गरज असुन गृहविलगीकरण ठेवलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी सांगितले


बार्शी शहरातील विविध भाग कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहेत . दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळत आहेत  रॅपिड टेस्ट वाढल्या आहेत त्या तुलनेत रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडत आहे लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना गृहाविलगीकरणात ठेवले जात आहे मात्र हे रुग्ण राजरोसपणे बाहेर फिरत आहेत अशा लोकांवर आजुबाजुच्या शेजाऱ्यांनीच नजर ठेऊन संबधित फिरत असलेल्या रुग्णा बाबत नगर पालिकास कळवावे असे आवाहन ही मुख्य धिकारी यांनी केले आहे.


तसेच बाजारपेठेत अनेक व्यापारीकडुन सामाजिक अंतरचे पालन होताना दिसत नाही. थर्मल गण , मास्क , सेनेटाईजर उपयोग होताना दिसत नाही व्यापाऱ्यांनी जर काळजी घेतली नाही तर नाईलाजस्तव दुकाने सिल करण्याचेही कारवाई करणार असल्याचे सांगितले तर नागरीकही कोरोना विषयक कसलीच काळजी घेताना दिसत नाही . सध्या काळजी करण्याची स्थिती आहे. गल्ली बोळात रेशन दुकानावर भाजीपाला साठी लोक गर्दी करत आहेत . नागरीकांनी कोरोनाला हलक्यात घेऊ नये लहानशी चुक ही आपल्याला धोका निर्माण करू शकते तर ६० वर्षापुढील नागरीक व जे इतर अजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांनीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे .

टेस्ट साठी नागरीकांनी स्वतःहुन पुढे यावे

शहरात मोठ्या संख्ये नी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत नागरीकांनी मनातील भीती काढुन ज्यांना लक्षणे असतील अथवा काही त्रास वाटत असेल त्यांनी स्वतः हुन पुढे येऊन आपली टेस्ट करून घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले

बार्शीत  अंब्युलन्स व बेडची स्थिती माहीतीसाठी कन्ट्रोल रुम नपात सुरुवात .

प्रातांधिकारी यांचे सुचनेवरून शहरात उपलब्ध बेड व अंम्बूलन्स साठी २४ तास उपलब्ध कंन्ट्रोलरुम तयार करण्यात आले असुन नागरिकांनी  २२२२१८
या नंबरवर फोन करून  बेड ची स्थिती व अंबुलन्स साठी करावा असे आवाहनही मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी केले आहे .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here