आजी- माजी यांना प्रवेश देणार नसाल तर…..
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बारबोले निवासस्थानी भेट
बार्शी- माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या निवासस्थानी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अचानक भेट दिली व भोजनाचा अस्वाद घेतला.


यावेळी बंद दारा-आड झालेल्या चर्चेत आजी- माजी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देणार नसाल तर मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करीन असा सावध पविञा बारबोले यांनी घेतला असल्याची माहिती आहे.
परिसंवाद याञेनिमत्त सोलापूर जयंत पाटील जिल्ह्यात फिरत आहेत. नियोजित दौऱ्यात बार्शी शहराचा दौरा उल्लेख नसतानाही पाटील यांनी भेट दिली. यावेळी बंद खोलीत दोघांत प्रदीर्घ चर्चा झाली. पाटील यांच्या या दौऱ्यामुळे बारबोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
