बार्शी ;चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील पानगाव-कोरफळे रस्त्यावर घडला.याप्रकरणी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास अटक करण्यात आली आहे.

Husband strangled to death in Pangaon area of Barshi taluka on suspicion of murder
सोनाबाई सचिन येवले वय 35 रा.कळंबवाडी (पा) ता.बार्शी असे चारित्र्याच्या संशयावरून खुन झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सचिन राजेंद्र येवले वय 40 असे पत्नीचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.
सौ. तारामती पवार वय 52 वर्षे, रा. कळंबवाडी(पा)
ता. बाशी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा भाऊ चंद्रकांत याची मुलगी सोनाबाई हिचे लग्न माझी मोठी बहीण राधाबाई राजेंद्र येवले रा. कळंबवाडी(पा) यांचा मुलगा सचिन याचे सोबत सुमारे 14 वर्षापूर्वी झाले होते. ते कामानिमित्त डोंबीवली, जि. ठाणे येथे राहण्यास आहेत.सचिन याला 1 मुलगा व 1 मुलगीआहेत. सुमारे 2 वर्षापूर्वी सचिन येवले याने त्यांना सोनाबाई ही परपुरुषाशी सबंध ठेवत असल्याचे सांगितले होते.
त्यावेळी आम्ही सर्व नातेवाईकानी सोनाबाई हिला व्यवस्थित नांदण्यास सांगितले होते.

दिनांक 25 मे रोजी सकाळी 8 वाजता सचिन याने माझा भाऊ चंद्रकांत जाधव याला फोन करुन सांगितले कि, मी सोनाबाई हिला बार्शी येथील हिरेमठ हॉस्पीटल येथे अॅडमीट केले आहे असे सांगितले.
त्यावेळी भाऊ चंद्राकांत हा तिला बार्शी येथे भेटून आला होता. त्यावेळी त्याने मला सांगितले कि, सोना ही
परपुरुषाशी सबंध ठेवत असल्याने सचिन याने तिला मारहाण केली असुन त्यामुळे तिला दवाखान्यात अॅडमीट केले आहे असे सांगितले होते.
फिर्यादीने सोनाबाई हिला भेटुन तु चांगले वाग, समाजात आपल्याला नावं ठेवतात. तु व्यवस्थित नांद
असे समजावून सांगितले होते. त्यावेळी तिने सांगितले कि, नवरा मला जिवच मारणार आहे, मला भिती वाटत आहे
असे सांगितले होते.
दि.5 जुन रोजी सायंकाळी सांयकाळी 6 वाजता मी, भाऊ असे सौंदणे (ढोकी) येथे असताना सचिन येवले हा त्याची पांढ-या रंगाची चारचाकी गाडी नं.
MH 05 DH 9484 घेवुन आला व मी सोना हिला मुंबई येथे घेवुन जातो. तिला मारहाण करणार नाही, तिच्यावर
संशय घेणार नाही असे सांगून घेवुन जाणेबाबत विनवीत होता. त्यावेळी आम्ही सचिन याला व सोना हिला देखील
समजावून सांगून यापूढे भांडण-तंटा करू नका असे सांगितले. त्यानंतर सचिन हा सोनाबाई हिला त्याचे गाडीतून
घेवुन गेला होता.
पानगाव-कोरफळे रस्त्यावर सचिन याने पत्नीस चारचाकी गाडीतच गळा आवळून खून केला.याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनी शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.