मंदिर उघडल्यावर मंदिरातील गर्दी कशी रोखणार, राज ठाकरेंचा पुजाऱ्यांना उलट सवाल…..!
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून सर्व देवस्थाने आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे मंदिरातील पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ अली होती. याच पाश्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मंदिर उघडे करण्याची मागणी केली. मात्र राज ठाकरे यांनी मंदिर उघडण्यावर आता प्रश्नचिन्ह निरमा केले आहे.


राज ठाकरे म्हणाले की, सध्या कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. जर मंदिर किंवा धार्मिकस्थळे उघडल्यास भक्तांची गर्दी होईल. या गर्दीला कसे रोखणार? असा प्रश्न त्यांनी उलट पुजाऱ्यांनाच केला. गर्दी टाळण्यासाठी भाविकांवर नियंत्रण कसे ठेवणार?, आम्ही आमच्यापुरती काही नियमावली केल्या आहेत. जर मंदिरे उघडायची असेल तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही नियमावली बनवावी लागेल. ती नियमावली राज्य सरकारला द्यावी लागेल असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत म्हटलं होतं की, मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. कारण, त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. तसेच, लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळे याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे रोहित पवार यांनी म्हटलं होतं.