आमदारकी मिळताच शेतकऱ्यांचा नेता शांत कसा ; चंद्रकांत पाटलांचा सवाल
आज शेतकऱ्यांचा नेता म्हणून मिरवणारे आमदारकी मिळताच शांत बसले आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यावर केलेली आहे. काहीच दिवसापूर्वी शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती.


सध्या राज्यात दुधाला २२ रुपये इतरा दर मिळत आहे. पण, या रकमेतून मूलभूत खर्चाची जुळवाजुळव करत असतानाही शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. लॉकडाऊन होण्याआधी दुधाला प्रतिलीटर साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. पण याबाबत आता मात्र निषेध होताना दिसत नाही. एकेकाळी दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेऊ म्हणाऱ्या राजू शेट्टी यांच्याकडून आता मात्र कोणतीही भूमिका मांडली जात नाही, असं म्हणत पाटील यांनी शेट्टींवर तोफ डागली.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम ही स्वीकारार्ह नसून त्यासाठी शेट्टी यांची भूमिका महत्त्वाची आहे असं असतानाही त्यात होणारी दिरंगाई पाटील यांना खटकली. सोबतच राज्यात असणआरा युरियाचा तुटवडाही शेतकऱ्यांपुढची मोठी समस्या असल्याची बाब त्यांनी शेट्टींना बोचऱ्या स्वरात लक्षात आणून दिली.