आपल्यातली निर्णयक्षमता कशी वाढवता येईल??  वाचा सविस्तर-

0
371

आपल्यातली निर्णयक्षमता कशी वाढवता येईल?? 

आज सकाळीच ऑडिट मध्ये मला एक चूक सापडली जी कंपनीला अतिशय महागात पडली. आज हे नुकसान जरी कंपनीचे असले तरी निर्णय माणसांचा आहे. असे निर्णय का चुकतात? आपण सरासरी दिवसामागे किती निर्णय घेतो असे आपल्याला वाटते?

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासनुसार ही संख्या प्रत्यक्षात हजारोंमध्ये आहे. यातील काही निर्णयांचा आपल्या आयुष्यावर परिणामकारक परिणाम होतो (जसे की व्यापाराची जागा, लग्न करणे किंवा मुलं असणे), तर काही तुलनेने क्षुल्लक आहेत (जसे की नाश्ता किंवा जेवण काय करू). आपल्या चुकीच्या निर्णयाकरिता आपल्या काही खराब सवयी आणि कारणे कारणीभूत आहेत जसे की :

१. ट्रायल अँड एरर किंवा रुल ऑफ थम्ब- ही पद्धत कधी-कधी निर्णय घेताना वापरतो व तो चुकीचा ठरतो. कित्येकदा ही पद्धत आपली कायमची सवय होऊन जाते.

२. खूप आशावादी होऊन निर्णय घेणे. (ओव्हर कॉन्फिडन्स.)

३. आळशीपणा. भूतकाळातील निर्णयावर अवलंबून राहून निर्णय घेणे. नवीन बदल लक्षात घेत नाहीत.

४. अनपेक्षित घटनांची अपेक्षा न करणे. या निर्णयामुळे काही चुकीचे होऊ शकेल का याचा विचार न करणे.

५. कमजोर निर्णयशक्ती- औदासिन्य, निराशा, चिंता, शारीरिक व्याधी, रक्तदाब इत्यादी आपल्या या क्षमतेला कमजोर करत असतात.

६. धोरणात्मक निर्णय न घेणे- पुढच्या परिणामाची चिंता न करता तात्पुरता निर्णय घेऊन मोकळे होतात.

७. निर्णय घ्यायला उशीर होणे- काहीजण त्यासाठी इतरांवर अवलंबून असतात.

८. तांत्रिक माहितीची उणिव- काही निर्णय घेताना तांत्रिकदृष्ट्या माहिती घेणे किंवा असणे क्रमप्राप्त असते.

९. घेतलेले निर्णय योग्य कसे हे पटवून देण्याची कला नसणे.

प्रत्येक निर्णय घेताना रिस्क असतेच आणि ती आपण आपल्या मानसिक ताकदीवर घेत असतो. ही मानसिक ताकद प्रक्रिया आपल्या विचारांवर प्रभाव पाडतात:

१. निर्णय चुकला तरी ती चूक पचवण्याची, जबाबदारी घेण्याची ताकद असणे. त्यातून शिकून पुढे वापर करणे. वहीत नोंद ठेवणे.

२. सर्व जोखीम पाहून पाऊल उचलण्याची शक्ती. निर्णय का घेतला याची माहिती असणे.

३. सकारात्मकता – आत्मविश्वास आणि अभ्यास यांच्या ताकदीवर अवलंबून.

४. बदल पटकन आत्मसात करून पुढील रूपरेषा त्वरीने पूर्ण करणं.

५. निर्णयप्रक्रिया क्लिष्ट असते अशा ठिकाणी योग्य त्या गुरुचे मार्गदर्शन घेणे.

६. चिंतामुक्ती करिता मेडिटेशन, व्यायाम, योग, समुपदेशन, चांगले मित्र-संस्कार, वेळोवेळी हेल्थ व रक्त चेक-अप.

७. आहार व शरीर योग्य असेल तर मेंदूला ताकदवर होतो. वेळेला महत्व त्यामुळेच येते. मेंदूला आणि शरीराला आठवड्यातून सुट्टी दिली तर छानच.

मी योग्य निर्णय कसा घेऊ? मी योग्य निर्णय घेत आहे आणि हे निर्णय मला चांगले परिणाम देईल हे मला कसे कळेल? माझे विचार माझ्या कार्यावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतील की नाही हे मी कसे ठरवू शकतो? या व्यतिरिक्त, मी माझ्या कार्यासह इतर भागधारकांना कसे आनंदित करू?

जेव्हा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात अशा प्रकारच्या प्रश्नांचा सामना करावा लागत नसेल तेव्हा हे फार क्वचितच घडते. आम्हाला दररोज आपल्या घरात आणि शेतात अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. व्यवस्थापक, पर्यवेक्षक किंवा गृहिणी म्हणून घेतलेला प्रत्येक निर्णय आमच्या शिक्षेच्या क्षमतेचे एक मापन बनतो.

ध्यान केल्याने आपली निर्णय घेण्याची क्षमता सुधारू शकते हे जाणून आपली उत्सुकता आणखी जागृत होईल . ध्यान ही एक प्राचीन शक्तिशाली पद्धत आहे ज्याच्या अभ्यासामुळे आपले मन मजबूत उर्जा स्त्रोत बनते, जेणेकरून आपले म

मानसिक ताकद आपल्याला निराशेच्या चक्रातून बाहेर काढण्यास मदत करते. म्हणून भविष्यात जर आपले निर्णय चुकवायचे नसतील तर एकमेव पर्याय म्हणजे स्वतःतील ताकद ओळखणे आणि मानसिकतेसोबत तिला डेव्हलप करणे. त्यासाठी मनाच्या आरशाला साफ करा आणि डोकवा आतमध्ये ….

श्रीकांत कुलांगे
9890420209

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here