राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

0
24

आजचे पंचांग – Today’s Horoscope 23 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – सोमवार.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

23 .01. 2023

शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- धनिष्ठा.

चंद्र राशी – मकर 13.51 पर्यंत नंतर कुंभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मोरपंखी )

मित्रमंडळींना आज दुरूनच राम राम केलेला बरा. आज आपल्या ध्येयप्राप्तीस तुम्ही प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिद्ध कराल. तुमचे विरोधकही आज तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील.

वृषभ (शुभ रंग- जांभळा )

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्यायला हवे. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडेल. काळजी घ्या.

मिथुन ( शुभ रंग- निळा )

आज कमी श्रमात जास्त लाभाची अपेक्षा करून चालणार नाही. विश्वासू मित्रांकडूनही दगा होऊ शकतो, सतर्क रहा. गाडी चालवताना गाणी गुणगुणू नका.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी.)

नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण कितीही वाढला तरीही वरिष्ठांचे सहकार्य राहील. आज जोडीदाराकडूनही तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील काही शुभ समाचार मिळतील.

सिंह (शुभ रंग- राखाडी)

नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. काही आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आज कुणाला सल्ले देऊ नका फक्त आपलं कसं चाललंय तेवढं बघा.

कन्या ( शुभ रंग- मरून)

आज तुमच्या अंगी चैनी व विलासी वृत्ती बाळा. कमी श्रमात जास्त लाभाची स्वप्ने पहाल. आज तुम्ही हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्याल सामान्य दिवस.

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)

बऱ्याच दिवसापासून रेंगाळलेल्या घरगुती कामात आज लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत चांगली राहील. मुले अभ्यासात लक्ष देतील.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम )

आज प्रत्यक्ष कृतीपेक्षा रिकामटेकड्या गप्पा मध्ये तुमचा बराच वेळ फुकट जाईल. सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या कामी येतील. आज शेजारी आपलेपणानेच डोकावतील.

धनु- (शुभ रंग- हिरवा)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल. अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठवस अगत्याने कराल. आज मोजकेच बोलणे प्रभावी राहील.

मकर ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुम्ही स्वतःच्याच प्रेमात राहाल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा प्रयत्न राहील. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय मात्र अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

कुंभ (शुभ रंग – पांढरा )

कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमा खर्चाची गणिते बिघडतील. गृहिणींना पूर्वीची बचत आज काम येईल. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. दूरचे प्रवास होतील.

मीन -(शुभ रंग – मोतिया )

लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण करेल. मुला-मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज शुभ चिंता म्हणजे शुभच होईल. वाणीत गोडवा असायला हवा.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here