घर देण्याचे आमिष दाखवुन बार्शी व सोलापुरातील लॉजवर नेऊन महिलेवर केला अत्याचार
बार्शी प्रतिनिधी :
घर घेऊन देण्याचे आमिष दाखवुन त्या’ महिलेकडुन १३ लाख रुपये घेऊन ती रक्कम परत न देता फसवणूक करून तिला बार्शी व सोलापुर येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी धनराज अंबय्या मेरगू ( वय ३८ रा. विको प्रोसेच्या पाठीमागे क्रांती नगर न्यू पाच्छापेठ सोलापूर ) याच्याविरूध्द बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


बचत गटाच्या माध्यमातुन पिडीत व संशयित आरोपीची ओळख झाली होती. डिसेंबर २०१८मध्ये त्याने तिला प्रपोज केला. पहील्यांदा तिने त्यास नकार दिला मात्र तो सतत मागे लागुन बोलण्याचा प्रयत्न करत होता.पिढीतेस कोणाचा आधार नसल्याने तिने त्यास होकार दिला त्यामुळे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले तिने त्यास घर देण्याची मागणी केली त्यावेळी त्याने दोन वर्ष थांबण्यास सांगितले व तिच्याकडुन त्याने घर घेण्यासाठी निम्मी रक्कम मागितली.
त्यानंतर पिडिताने विविध ठिकाणावरुन बचत गटाचे व युनियन बँकेतुन मुद्रा लोन काढुन १३ लाख रुपये दिले. त्यानंतर त्याने तिला बार्शीतील कुर्डुवाडी रोडवरील लॉजमध्ये भेटण्यास बोलाविले तिथे तिचा नकार असताना जबरदस्तीने अत्याचार केला.

याबाबत कोणाला सांगितल्यास तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यांनतर त्याने अनेक वेळा बार्शी व सोलापुरातील लॉजवर नेऊन अत्याचार केला.पिढीताने त्यास पैसे परत मागितले असता तु फोन करायचा नाही, तु भेटायचे नाही, मला त्रास दिल्यास मी तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही. अशी धमकी दिली याबाबत आधिक तपास सपोनि. शिवाजी जायपात्रे हे करित आहेत.