अन पोलीस तक्रारीची दखल घेत नाही म्हणत तो आत्महत्या करण्यासाठी झाडावर चढला… वाचा सविस्तर पुढे काय घडले ते

0
1709

बार्शी  ः पांगरी पोलिस ठाण्याचा जाहीर निषेध, वंदे मातरम अशी घोषणाबाजी बार्शी तहसील कार्यालयासमोरील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आवारातील चिंचेच्या झाडावरुन चढून माझ्यावर अन्याय झालाय, मी दिलेल्या तक्रारींची पांगरी पोलिस दखल घेत नाहीत, लवकर कारवाई व्हावी अन्यथा मी उडी टाकून जीव देतो, आत्महत्या करतो असे म्हणत मोठ्याने ओरडून तरुणाने झाडावरुनच पोलिसांना सांगत आत्महत्या करण्याचा इशारा दिला. . ही घटना 15 ऑगस्ट रोजी सकाळी घडली.

शरद रामलिंग भालेकर(वय 28 रा.खामगाव,ता.बार्शी)असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव असून बार्शी शहर पोलिसांत त्याचेवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद पोलिस गणेश वाघमोडे यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी येथील पोलिस उपअधिक्षक कार्यालयास शरद भालेकर याने ता. 14 ऑगस्ट रोजी आत्महत्या करणार असल्याचे निवेदन दिले होते. तसेच त्याने 15 जुलै रोजी पांगरी पोलिस ठाण्यासमोर उपोषणास बसले असताना पोलिसांनी त्यास मारहाण केली होती असे निवेदनात म्हटले आहे. 

पांगरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर भ्रष्ट आहेत, त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, गुंडांशी संगनमत करुन छळ करतात, फोन घेत नाहीत, वरिष्ठांकडे तक्रारी करुनही कारवाई होत नाही असे भालेकर याने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. 
त्यानुसार शहर, तालुका, पांगरी ठाणे, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस कर्मचारी त्याचेवर लक्ष ठेवून थांबले होते.गेल्या पंधरा दिवसापूर्वी हुंदळेकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सुधाकर तोरडमल याची नियुक्ती करण्यात आले आहे.

तहसील कार्यालयाची ध्वजारोहणाची तयारी सुरु असताना शरद भालेकर रॉकेलचे भरलेले कॅन घेऊन तहसील कार्यालयाकडे येत असताना पोलिसांना दिसला. 
पोलिस त्याचा पाठलाग करीत आहेत असे दिसताच त्याने शेजारीच असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाकडे गेला.

मोठमोठ्याने ओरडतच त्याने कॅन खालीच फेकून दिले अन्‌ चिंचेच्या झाडावर चढला. त्यापाठोपाठ एक पोलिस त्याला पकडण्यासाठी चिंचेच्या झाडावर चढला. पण तो झाडावर खूपच उंच ठिकाणी पोहोचला. तू खाली ये असे पोलिस विनंती करीत होते. 

पांगरी पोलिसांकडे तक्रार केली, उपोषण केले पण पोलिस दखल घेत नाहीत, 15 जुलै रोजीचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी माहिती अधिकारमध्ये केलीय. पण ते दिले जात नाही. आता मी उडी मारुन जीवच देतो, असे म्हणत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा गोंधळ सुरु असतानाच पोलिस उपअधिक्षक सिद्धेश्वर भोरे, तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे घटनास्थळी आले. जिल्हा विशेष शाखेचे पावलकर यांचेसह त्यांनी वरिष्ठांकडून योग्य ती कारवाई केली जाईल, तू खाली ये असे आश्वासन दिल्यानंतर भालेकर झाडावरुन खाली आला तेव्हा पोलिसांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.  

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here