पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या धाकट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

0
397

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी महायुतीची सत्ता असताना वेळोवेळी उद्धव ठाकरे यांचा धाकटा भाऊ असा उल्लेख केला.

त्याचबरोबर मोदींनी ट्विट करून सुद्धा मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या आहेत. आपल्या वयाची ठाकरेंनी साठी पूर्ण केली. तसेच शुभचिंतकांना या वर्षीच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन केले. तसेच आपला वाढदिवस साजरा करणार नसून तो कोरोना विरुद्धच्या लढ्याला समर्पित करणार असे म्हटले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मोदींनी उद्धव यांना शुभेच्छा देताना ट्विट करताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो.

यासोबतच, उद्धव ठाकरे यांना पीएम मोदींनी एक पत्र पाठवले. वाढदिवस हा गतकाळातील स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो. त्याबरोबरच हा दिवस भविष्याची रूपरेषा निश्चित करण्यासाठी एक संधी असते. आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल असा मला विश्वास आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here