वाढ काही थांबेना: सोलापूर ग्रामीण भागात148 अहवाल पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू

0
366

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका भागातील काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले होते. ज्या ग्रामीण भागात संसर्ग जास्त आहे त्या भागात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कडक संचारबंदी लागू केली होती.

मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग होत असल्याने दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज मंगळवारी ग्रामीण भागातील 148 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 71 पुरुष तर 77 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 139 आहे. आज 944 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 796 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांनी दिली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अक्कलकोट तालुक्यातील 453 रुग्ण,
बार्शी येथील 721,करमाळा येथील 86,माढा येथील 145, माळशिरस येथील 148 बाधित रुग्ण, मंगळवेढा मधील 83 ,मोहोळ तालुक्यातील 220 उत्तर सोलापुरातील 253 जण बाधित आहेत.पंढरपूर तालुक्यातील 421,
सांगोला तालुक्यातील 56, दक्षिण सोलापुरातील 534 रुग्ण असे एकूण 3120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

अक्‍कलकोटमधील बेडर गल्ली, दुधनी, मैंदर्गी, स्वामी समर्थ नगर, तडवळ येथे प्रत्येकी एक, म्हाडा कॉलनीत दोन, बुधवार पेठेत चार, करमाळ्यातील फंड गल्लीत एक, शेलगाव (क) मध्ये पाच, माढा तालुक्‍यातील रिधोरेत 17, उपळाई खु.मध्ये एक रुग्ण आढळला आहे.

माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, लवंग, मांडवे, नातेपुते, वाफेगाव, यशवंत नगर येथे प्रत्येकी एक, मोहोळमधील रोहिदास नगरात तीन, साठे नगरात दोन, कामती बु. येथे सात, पापरीत दोन रुग्णांची भर पडली आहे. उत्तर सोलापुरातील डोणगावात एक, हिरजेत चार, वडाळ्यात 19,

पंढरपुरातील अनिल नगर, बडवे गल्ली, चंद्रभागा घाट, गांधी रोड, इंदिरा गांधी मार्केट, जुना सोलापूर नाका, कदबे गल्ली, खवा बाजार, रामबाग रोड, सावता माळी मठ, भांटुबरे, फुलचिंचोली, नेपतगाव, तुंगत येथे प्रत्येकी एक, सिध्दीविनायक सोसायटीत तीन, बोहाळीत सहा, नारायण चिंचोलीत दोन रुग्ण आढळले.

तर सांगोल्यातील बलवडी, निजामपूर, शिरभावी येथे प्रत्येकी एक, महूद येथे तीन, वझरे येथे पाच रुग्ण सापडले. दक्षिण सोलापुरातील धोत्रीत सहा, कासेगावात चार आणि बार्शीतील अलिपूर रोड परिसरात सहा, भवानी पेठ, ढगे मळा येथे प्रत्येकी दोन, भिम नगर, कासारवाडी रोड, सासुरे, सिध्देश्‍वर नगरात प्रत्येकी एक, तर हळदुगे येथे सहा रुग्ण आज सापडले आहेत. 

‘येथील’ सात जणांचा झाला मृत्यू 

पंढरपूर तालुक्‍यातील फुलचिंचोली येथील 40 वर्षीय महिला, बालाजी नगरातील 50 वर्षीय पुरुषाचा, करमाळ्यातील शेलगाव (क) येथील 40 वर्षीय महिला, दक्षिण सोलापुरातील वळसंग येथील 65 वर्षीय महिला, मंद्रूप येथील 75 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील सासुरे येथील 71 वर्षीय पुरुष, सनगर गल्लीतील 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here