रस्तापुर येथील ग्रामसेवक धर्मे लाचलुचपतच्या जाळ्यात
बार्शी: गणेश भोळे
तक्रारदार यांनी पदरखर्चाने काही ग्रामविकास कामे केली होती , ग्रामविकास निधीअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेतून तक्रारदार यांना त्यांचे स्वखर्चाची रक्कम परत मिळणेकरिता संबंधित वस्तू खरेदी केलेल्या दुकानदारास रक्कम मिळणेकरिता चेक काढावे लागतात.


त्याकरिता यातील तक्रारदार यांनी चेकवर स्वाक्षरी केलेल्या आहेत परंतु यातील आलोसे यांनी सदर चेकवर स्वाक्षरी करण्याकरिता तक्रारदार यांचेकडे ग्राम विकास निधीच्या एकूण रक्कम ₹ ८,५०,०००/- च्या सुमारे ३ % रक्कम बक्षीस- लाच म्हणून ₹ २६,०००/- ची मागणी केली व तडजोड म्हणून २.१/२ रक्कम २१,२५०/- सापळा कारवाई दरम्यान आज बुधवार दि ३ मार्च रोजी स्वीकारली असता यातील बाळासाहेब दादाराव धर्मे, याना रंगेहात पकडण्यात आले आहे.
यात आरोपी लोकसेवक – बाळासाहेब दादाराव धर्मे, (य 51 वर्षे, ग्रामसेवक(वर्ग 3),( रस्तापुर, ता. बार्शी) यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले
पोलीस उपअधीक्षक, संजीव पाटील,पोलीस निरीक्षक कविता मुसळे पोलीस अंमलदार अर्चना स्वामी, उमेश पवार, स्वप्नील सन्नके ला. प्र .वि . सोलापूर युनिट यांनी हि कारवाई केली.