शेतकऱ्यांसाठी खुशखबर : शेतजमीन घेणे झालं सोपं, आता बँक देणार कर्ज
ग्लोबल न्यूज: भारत हा शेतीप्रधान देश म्हणून गणला जातो मात्र आज भाऊ-बंधकीमध्ये जमिनीचे विभाजन होऊन काही जागाच आता शेतकऱ्यांच्या वाट्याला शिल्लक राहिली आहे.

त्यामुळे शेतीच्या पिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतजमीन घेण्यसाठी आता बँक जमिनीच्या मूळ किमतीच्या ८५ % रक्कम कर्ज म्हणून शेतकऱ्यांना देणार आहे.

त्यामुळे शेतजमीन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एसबीआय म्हणजेच भारतातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली आहे. यामुळे शेती घेणे सोपे होणार आहे. अल्पभूधारकांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार असून शेत घेण्याचे त्यांचे स्वप्न यातून पूर्ण होणार आहे.

या योजनेत बँकेकडून जमीन खरेदी करण्यासाठी एसबीआय ८५ टक्के पैसे देणार आहे. तर शिल्लक असलेले १५ टक्के रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. या योजनेचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे शेतकऱ्यांना पूर्ण जमिनीचे पैसे फेडण्यासाठी ७ ते १० वर्षाची मुदत दिली जाते.
बँकेचे पूर्ण पैसे फेडल्यानंतर जमीन तुमच्या मालकीची होते. अशा महत्त्वपूर्ण योजनेचा कसा फायदा घ्यायचा याची माहिती आज या लेखातून आपण घेणार आहोत..
