मला माझी राजधानी आणि उप-राजधानी जोडणारी ट्रेन द्या – मुख्यमंत्री
ग्लोबल न्युज: सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज सकाळी प्रसार माध्यमांवर दाखवण्यात आला. यावेळी राऊत यांनी मुंबई ते अहमदाबाद सुरु असलेल्या बुलेट ट्रेन विषयी आपण कसा पाहता आणि आपली भूमिका काय असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. यावेळी बुलेट ट्रेन विषयी मुख्यमंत्र्यांनी आपले मत मांडले आहे.


यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणले की, मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन, माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरुन विदर्भाच्या मनात जो दुरावा करुन दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल.

पुढेच बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, भूसंपादन करताना ज्यांनी विरोध केला त्यांच्या मागे शिवसेना आहे. शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून जे काही करायचंय तो निर्णय आपण घेऊच, पण ज्यांचा ज्यांचा विरोध आहे, त्यांच्या मागे शिवसेना आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.