गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आधीचं अडचणी आणि बकरी ईद साजरा करण्यासाठी सुविधा -संदीप देशपांडेची सरकारवर टीका
सध्या कोरोनाच्या काळात महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. यातच आता गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांना येत असलेल्या अडचणींच्या मुद्द्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेली पाहावयास मिळत आहे.


गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी येतात. मात्र, राज्य सरकार बकरी ईद साजरी करण्यासाठी सुविधा देत आहे, अशी जोरदार टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपाडे यांनी केली आहे. गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्यात क्वारंटाईनच्या नियमांमुळे अनेकांनी आपले गाव आधीच गाठले आहे.
मात्र, फिजिकल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे बसमधून मर्यादित संख्येनेच प्रवासी नेता येतात. त्यामुळे एसटी आणि खासगी बसच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हाच मुद्दा मनसेने आता लावून धरला आहे. राज्य सरकार कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी बसेसची सोय करु शकत नसेल तर मनसे त्याची व्यवस्था करेल. राज्य सरकारने आम्हाला त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.