बार्शी तालुक्यातील गोडावून मधून सोयाबीन चोरणाऱ्या टोळीला मुद्देमालासह अटक; तालुका पोलिसांची कारवाई

0
436

बार्शीत विनीयोग वेअरहॉसींगमधुन  ५,६०,००० रुपयांची सोयाबीनची  झाली होती चोरी, 

चोरीच्या तक्रारी अगोदरच ५ संशयित आरोपीसह सोयाबीन ने भरलेला ट्रक पोलिसांच्या ताब्यात

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


बार्शी तालुक्यातील गोडावून मधून सोयाबीन चोरणाऱ्या टोळीला मुद्देमालासह अटक; तालुका पोलिसांची कारवाई

बार्शी  प्रतिनिधी

राजस्थान गम प्रा.लि. या कंपनीसाठी कमोडीटी अल्फा या कंपनीने खरेदी केलेला सोयाबीनचा साठा स्टार अॅग्री कंपनीच्या बार्शी येथे विनीयोग वेअरहॉसींग कॉर्पोरेशन गोडावून नं. ४ चे शटरचे कुलुप तोडुन गोडावून मधील अंदाजे २०० सोयाबीनचे कटटे (किंमत रूपये ५,६०,०००- रू अंदाजे) हे दि.१७ जानेवारी २०२१ रोजी सायं. ०५.०० वा ते दि.१८ जानेवारी २०२१ रोजीचे पहाटे ०२.३० वा चे दरम्यान घडली. याबाबत स्टार अॅग्री कंपनीच्या कैलास आत्माराम काळबांडे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. मात्र फिर्याद देण्यास अगोदरच पोलिसांनी या गुन्ह्यातील ५ संशयित आरोपीसह सोयाबीनने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक नंबर एम. एच.१२, एम.व्ही.३८४४ ताब्यात घेण्यात यश आले आहे.

राजेंद्र छगन काळे ,बालाजी तानाजी शिंदे ,सुनीलदादा काळे ,शहाजी अरून शिंदे, अर्जुन सुब्राव शिंदे ,विक्रम वाघमारे, (चालक) रा.बाभळगाव ता.कळंब जि.उस्मानाबाद यांना पोलिसांनी अटक केली तर  पिल्या रवि काळे, शंकर‌ शिवराम काळे व ९)बबलु दादा काळे हे पळून जाण्यात यशस्वी झाली आहे.


कैलास काळबांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले

 मी सप्टेंबर २०१७ पासुन स्टार ॲग्री वेअरहाउसींग येथे राज्य प्रमुख या पदावर नोकरीस आहे. सदरची स्टार अॅग्री कंपनी ही फक्त वेअरहाउस प्रोव्हाईड करते, राजस्थान गम प्रा.लि. या कंपनीसाठी

कमोडीटी अल्फा या कंपनीने खरेदी केलेला सोयाबीनचा साठा आमची कंपनी बार्शी येथे

विनीयोग वेअरहॉसींग कॉर्पोरेशन, गट नं.१४३३१बी. तुळजापुर रोड, कदमवस्ती,बार्शी येथे साठवणुक करून तिची देखभाल करते. सदर विनीयोग वेअरहाउसींगचे ३ गोडावुन आम्ही भाडयाने घेतलेले आहेत. बार्शी येथील गोडावुनचे देखभालीसाठी सुपरवायझर म्हणुन  शशीकांत गणपत कदम रा.मांडेगाव ता.बार्शी हे काम पाहतात. गोडावुन मॅनेजर म्हणुन विलास‌ तानाजी सोमदळे रा.चौपाड, सोलापूर हे काम पाहतात. तसेच त्यांच्या मदतीसाठी तेजश पायघन हे नेमलेले आहेत.

माहे ऑक्टोंबर २०२० मध्ये राजस्थान गम या कंपनीने मोतीलाल जिवन माढेकर रा.‌बार्शी यांचेकडून सोयाबीनची खरेदी केलेली होती. सदर खरेदी केलेले सोयाबीन हे विनीयोग वेअरहॉसींग कॉर्पोरेशन, तुळजापुर रोड, कदमवस्ती,बार्शी येथील गोडावून नं. ४ येथे वेळोवेळी आणुन ठेवलेले आहे. सदर गोडावून मध्ये एकुन ३१,९०१ सोयाबीनचे कटटे होते. सदर

गोडावुनला लोखंडी शटर असून त्यातील मुख्य दरवाज्यास बाहेरून कुलुप असते व इतर लोखंडी

शटरला आतुन कुलुप असते. दि. २१ डिसेंबर २०२० रोजी कंपनीमार्फत गोडावूनमध्ये ठेवलेल्या‌ सर्व मालाचे ऑडीट केले होते. त्यावेळी गोडावून मध्ये सोयाबीनचे ३१,९०१ कटटे होते. दि.१८ जानेवारी २०२१ रोजी मी औरंगाबादमध्ये असताना मला बार्शी येथील गोडावून मॅनेजर विलास सोमदळे यांनी ११.०० वा चे सुमारास फोन करून कळविले की, आपले गोडावून नं. ४ येथील मुख्य शटरचे बाहेरचे कुलुप तोडुन आतील सोयाबीनचे कटटे चोरीस गेलेले आहेत. अशी हकीकत सांगितलेने मी स्वत बार्शी येथे येवून गोडावूनची पाहणी केली असता मुख्य दरवाज्याचे कुलुप तुटलेले दिसलेने आत जावुन पाहीले असता गोडावुन मधील सोयाबिनचे कटटे कमी असल्याचे

दिसले. त्यावरून माझी खात्री झाली की, गोडावून मधुन सोयाबीन चे कटटे चोरीस गेलेले आहेत.

मी प्राथमीक गोडावूनची तपासणी केली असता मला गोडावूनमधील खालील माल चोरीस गेल्याचे आढळुन आले.५,६०,०००-रू सोयाबीनची भरलेली अंदाजे २०० कटटे, प्रत्येक कटटयाचे वजन अंदाजे ७० किलो, असे एकुन १४,००० किलो वजनाचे सोयाबीन त्याचा बाजारभाव अंदाजे ४० रू प्रतिकिलो दराचे सोयाबीन असे एकुन किं.अं. ५,६०,000- रू एकुन किंमत

त्यानंतर मला लोकांच्याकडून समजले की, बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे पोलीसांनी सोयाबीनचे कटटे चोरून घेधून जाणारा ट्रक व काही लोक पकडलेले आहेत. म्हणुन मी व स्टाफने बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे येवून खात्री केली असता पोलीस ठाणे आवारात एक लाल रंगाचा टाटा कंपनीचा ट्रक उभा असून त्याचा नंबर एम. एच.१२, एम.व्ही.३८४४ असा असल्याचा दिसला. सदर ट्रकमध्ये आमच्या

वेअरहाउसच्या गोडावून मधुन चोरीस गेलेले सोयाबीनचे कटटे दिसुन आले. यावरून बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी हे करीत आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here