बार्शी मंथनातून…..अमृतच निघेल…. वाचा बार्शीतील चालू घडामोडीचे विश्लेषण

0
196

बार्शी मंथनातून…..अमृतच निघेल…. वाचा बार्शीतील चालू घडामोडीचे विश्लेषण

पुराण कथांमध्ये झालेले समुद्र मंथन आपल्या सर्वांना माहीतच आहे. देव आणि दानव (दोन गट) यांच्यात समुद्रामध्ये झालेल्या समुद्र मंथनात विविध विद्या, शास्त्र, विष आणि अमृतही निघाले होते. समुद्र मंथनात निघालेल्या अमृताचे वाटेकरी सर्व होते पण विष कोण घेणार हा प्रश्न पुराण काळातही उपस्थित झाला होता. तेव्हा भगवान शिव शंकराने विष प्राशन केले होते. ही पुराणातील कथा असली तरी आजच्या काळातील चालू परिस्थितीला ही ती लागू पडते. यशाला अनेक साथीदार असतात पण अपयशाचा वाली कोण नसतो.

बार्शी तालुक्याच्या राजकारणात ही मागील वर्षा पासून समुद्र मंथन सुरू आहे. दोन गटात सुरू असलेल्या या मंथनातून चांगले, वाईट सर्व काही बाहेर निघत आहे. पण इथेही चांगले झाले तर आमच्या मुळे, वाईट झाले तर त्यांच्यामुळे असा सूर पाहायला मिळत आहे. सध्या बार्शीच्या राजकारणात वरवर पाहिले तर अनेक गट कार्यरत आहेत असे दिसते. पण अलीकडील काळात बारीक अभ्यास केल्यास बार्शी मध्ये दोनच गट खऱ्या अर्थाने सक्रिय आहेत असे दिसते ते म्हणजे एक राऊत समर्थक दुसरा राऊत विरोधक.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मागील अनेक वर्षे स्वतः राजकारणात पूर्णवेळ सक्रिय राहून यश-अपयश पचवून राऊत राजकारणात स्थिर झाले आहेत. त्यामुळेच बार्शीच्या जनतेने सर्व सत्ता त्यांच्या ताब्यात दिल्या होत्या. राऊत यांना मिळालेले यश सर्वांना दिसते पण त्यामागील संघर्ष कोणाला दिसत नाही. राऊत यांना मिळालेले यश म्हणजे मागील 25 वर्ष अविरत येणाऱ्या संकटाना मात देऊन सतत कष्ट व संघर्ष करून मिळाले आहे हे विसरून चालणार नाही.

त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे राऊत हे कधीही स्वतःला नेता मनात नाहीत, एक कार्यकर्ता म्हणून ते नेहमी अग्रेसर असतात, ग्राउंड लेव्हलला कार्यकर्त्यांत मिसळून ते काम करतात. त्यांच्या त्याच वृत्तीमुळे बार्शी तालुक्यात त्यांची मोठी कार्यकर्त्यांची फौज तयार आहे. त्यांच्याच बळावर त्यांनी हळूहळू सर्व सत्ता मिळवली आहे व भविष्यात त्याच पद्धतीने लढणार आहेत.

पण मागील काही दिवसांपासून बार्शी येथे जे वतावरण तयार झाले आहे ते पाहता रोज सोशल मीडियावरून आरोप केले जात आहेत. यात राजकीय नेते, स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते, काही पत्रकार, आंदोलनकर्ते असे सर्वच आहेत. त्याचा बोलवता धनी कोण आणि उद्देश काय हे सर्वसामान्य लोकांना वरकरणी लक्षात येत नाही. तीच गोष्ट राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांपुढे मांडली पाहिजे.

बार्शीमध्ये सुरू असलेल्या मंथनात एका बाजूस राऊत व दुसऱ्या बाजूस राऊत विरोधक आहेत. सत्ता केंद्राच्या माध्यमातून राऊत यांनी बार्शीचा कायापालट केला आहे. बार्शीच्या इतिहासात विक्रमी विकासकामे त्यांच्याच नेतृत्वात झाली हे सर्वानीच मान्य केले पाहिजे. सदा सर्वदा एकाच वेळी सर्वांचेच समाधान कोणीच करू शकत नाही. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे संपूर्ण विकास झाला असे कोणीच म्हणू शकत नाही. पण सर्वाधिक विकासाची कामे राऊत यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत हे निश्चित आहे.

बार्शी मध्ये सध्या सुरू असलेल्या मंथनात अनेक गोष्टींचा उहापोह होत आहे. या घडामोडीत चांगल्या कामाचे, विकासाचे श्रेय राऊत यांना जाईल म्हणून ते पुढे आणले जात नाही. पण काही निगेटिव्ह गोष्टी वारंवार पुढे आणल्या जाता आहेत. यात राजकीय, स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आणि काही पत्रकार आहेत. या मंथनातून निघणारे विष सध्या राऊत हे शांतपणे पचवत आहेत. त्यांनी आयुष्यात केलेला संघर्ष पाहता ते हे विष सहज पचवू शकतील यात शंका नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी या राजकीय समुद्र मंथनात पुढे येऊन संघर्ष केल्यास शेवटी अमृताच निघणार आहे.

जाता जाता शेवटी एकाच सांगेल की सध्या राऊत हे बार्शीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत. बार्शीत सध्या दोनच गट आहेत एक राऊत समर्थक एक राऊत विरोधक. राऊत विजयासाठी लढतील आणि राऊत विरोधक राऊत यांच्या पराभवासाठी. राऊत यांचा विजय झाला तर तो त्यांचा स्वतःचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा असेल राऊत गटाचा असेल. सरते शेवटी एकाच प्रश्न राहतो राऊत विरोधकांचे काय ? जे देशात सुरू तेच राज्यात आणि जे राज्यात सुरू तेच बार्शीत. मोदी-मोदी विरोधक, अकेला फडणवीस क्या करेगा आणि राऊत-राऊत विरोधक. शेवटी केंद्रस्थानी हीच लोक राहणार त्यांच्या भोवतीच सर्व राजकरण फिरणार.

सदरचे ” बार्शी मंथन ” हे बार्शीतील एका प्रगल्भ, अनुभवी व गेली ३५ ते ४० वर्षांपासून बार्शी शहर व तालुक्याचे राजकारण जवळून पाहिले व अनुभवले अशा राजकीय विश्लेषकाने केलेले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here