कर्ज प्रकरण करून देतो म्हणून 85 हजाराची फसवणुक
सोलापूर, (प्रतिनिधी):- येथील शेळगी परिसरात असलेल्या किराणा दुकान चालकाला कर्ज प्रकरण करून देतो म्हणून अज्ञात दोघांनी 84 हजार 750 रूपयाला फसवले. ही घटना दि. 15 जुलै रोजी घडली.

सतीश वसंत शिर्के (वय 48, रा. फ्लॅट नं.41, ढंगे रेसिडन्सी, शेळगी सोलापूर) असे फसवणुक झालेल्या किराणा दुकान चालकाचे नाव आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुकानात असताना त्यांच्या मोबाईलवर त्यांना अनोळखी एका इसमाने फोन केला की मुद्रा लोनची स्कीम सुरू आहे तुम्हाला मुद्रा लोन पाहिजे का.

त्याच्यावर विश्वास ठेवून लोन पाहिजे असे सांगितले असता मुद्रा लोन करून देतो त्याची प्रोसेसिंग फि द्यावी लागेल असे सांगितले त्यावरून बॅक पासबुक, पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड अशी कागदपत्रे 8130178597 या व्हॉटसअॅपवर पाठवले त्यानंतर तुमचे 20 लाख रूपयाचे मुद्रा लोन मंजुर झाल्याचे खोटे सांगून प्रोसेसिंग फि व बॅकेचे इतर चार्जेस करीता गुगल पेच्या माध्यमातून 84 हजार 750 रूपये भरून घेतले.
त्यानंतर आणखी पैशाची मागणी केल्याने संशय आला त्यावरून आरोपी विरूध्द पोलीसांकडे तक्रार अर्ज आल्याने त्यावरून सतीश शिर्के यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता दोघा अनोळखी इसमा विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दाईंगडे करीत आहेत.