बार्शीत काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा चार लाखांचा गहू-तांदूळ जप्त; बार्शी पोलिसांची कारवाई

0
1274

बार्शी : बार्शी येथील दलाल भीमाशंकर खाडे याच्यावर 110 टन तांदूळ पनवेल येथे काळ्या बाजारात विक्री केल्याचे उघडकीस येताच, महसूल आणि पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दोन्ही विभागांनी संयुक्तपणे दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे चार लाखांचा गहू व तांदूळ जप्त केला असून, तीन जणांविरोधात शहर व तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

श्रीकांत दिगंबर नान्नजकर (रा. आझाद चौक, बार्शी), संतोष विलास गोडसे (रा. अरणगाव), शिवाजी मारुती पांगरे (रा. उपळाई ठोंगे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुरवठा निरीक्षक अभयकुमार साबळे, हवालदार अजित वरपे यांनी फिर्यादी दाखल केल्या. ही घटना शुकवारी उपळाई ठोंगे येथे दुपारी चार वाजता तर मार्केट यार्डात रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शहरातील तुळजापूर रस्त्यावरील मार्केट यार्ड येथील गाळा क्रमांक आठ व नऊ या गाळ्यांमध्ये शासकीय रास्त भाव धान्य दुकानातील गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक अमोल ननवरे, केकान, लगदिवे, बागल व गोसावी यांनी नान्नजकर यांना दूरध्वनी केला पण त्यांचा फोन बंद होता. घरातील फोनवर फोन करून माहिती दिली तरी ते आले नाहीत.

मार्केट कमिटीचे सचिव तुकाराम जगदाळे, पुरवठा अधिकारीअभयकुमार साबळे व दोन पंच यांच्यासमवेत कुलूप तोडून पाहणी केली असता काळ्या, पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या ठिक्‍यांमध्ये प्रत्येकी 50 किलो वजनाचे 12 हजार 550 क्विंटल गहू, याची किंमत एक लाख 88 हजार 250 रुपये, 280 ठिके तांदूळ 14 हजार क्विंटल याची किंमत दोन लाख 10 हजार रुपये असे तीन लाख 98 हजार 250 रुपयांचे धान्य जप्त करण्यात आले.

उपळाई ठोंगे येथे गणपत शंकर रगडे याच्या घरात आठ ठिके गहू तर 35 ठिके तांदूळ यांची किंमत सहा हजार 850 असून या दोन्ही छाप्यात सापडलेल्या ठिक्‍यांवर भारतीय खाद्य निगम तसेच पंजाब, हरियाना, महाराष्ट्र सरकारचे शिक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रिकामी ठिके होती. शासनाची फसवणूक व अत्यावश्‍यक वस्तू अधिनियमानुसार बार्शी शहर व तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवाजी पांगरे यास अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे व अमोल ननावरे हे तपास करीत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here