शिक्षण मंडळाचे माजी सभापती पांडुरंग उर्फ बप्पा गव्हाणे यांचे निधन
बार्शी : पांडुरंग उर्फ बप्पा गव्हाणे (वय ७० उपळाई रोड बार्शी ) यांचे दि २० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्च्यात पत्नी, एक मुलगा, मुली, जावई सुना,नातवंडे असा परिवार आहे .त्यांचेवर मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले.


नगरसेवक मदनलाल गव्हाणे यांचे ते वडील होते. त्यांनी मराठी विषयातून शिक्षणशास्त्राची पदवी घेऊन १९६८ सालापासुन शिक्षण सेवेस प्रारंभ केला. मळेगाव येथील नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या उच्च माध्यमिक शाळेत त्यांनी ३१ वर्षे मुख्यध्यापक म्हणून काम पाहिले. १९९१ साली उत्कृष्ठ प्रशासक म्हणून गौरविण्यात आले होते. तसेच आदर्श शिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला होता.
उपक्रमशिलता व प्रशासन हातळण्याचे कौशल्य यामुळे ते १५ वर्षे बार्शी तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. सोलापुर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सल्लागारपदीही काम पाहीले. तसेच त्यांची २००४ साली बार्शी नगर पालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती.