माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा यांचे निधन
मुंबईः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे काल रात्री निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७५ वर्षांच्या होत्या.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


मुंबईत मनोहर जोशी यांच्या दादर इथल्या घरी रात्री 11 वाजता अनघा यांचं निधन झालं. दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.