अमर चौंदे
कळंब : कोरोना रुग्णावरील उपचारासाठी कळंब उपजिल्हा रुग्णालयात व कोविड सेंटरला पाच व्हेंटिलेटर उपलब्ध उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबसह वाशी, भूम आणि परंडा या चार तालुक्याच्या मिळून असणाऱ्या कळंब येथील कोविड सेंटरवर व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णावर उपचारासाठी अडचणी येत होत्या. तसेच उपजिल्हा रुग्णालयात अनेक गंभीर रुग्ण व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने दगावत असल्याने अनेक वर्षापासुन व्हेंटिलेटरची मागणी होती.

यासंदर्भात उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्र्याकडे पाठपुरावा केल्याने कळंब येथील उपजिल्हारुग्णालयास पाच व्हेंटिलटर मिळाले आहेत. कळंबकरांची खुप वर्षापासुनची मागणी पुर्णत्वास आल्याने आता गंभीर रूग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयामधे व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने हे रूग्णालय रेफर रूग्णालय म्हणुन प्रसिद्ध होते. सद्या कळंब येथील कोविड सेंटरमधे कळंबसह भुम – परंडा – वाशी तालुक्यातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतात. वैद्यकीय अधिक्षक डॉ. जिवन वायदंडे यांनी आमदार कैलास घाडगे – पाटील यांच्याकडे एक व्हेंटिलेटरची मागणी केली होती.
वांगरवाडी बालक खून: निर्दयी आईनेच केली पोटच्या ९ महिन्याच्या बाळाची हत्या;चोरीचा केला बनाव

14 ऑगस्ट रोजी पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी कोविड रुग्णालयाला भेट देवुन कोविड रूग्णांबरोंबर संवाद साधत अडचणी ऐकुण घेतल्या होत्या.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. जीवन वायदंडे, डॉ. स्वप्नील शिंदे यांनी व्हेंटिलेटरची मागणी करत कोविड सेंटरसाठी स्वतंत्र अँबुलन्स, कोरोना संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याने भिषक तज्ञ तसेच कळंब शहर हे उस्मानाबाद
, बार्शी, लातुर, अंबाजोगाई या ठिकाणापासुन 60 ते 70 किमी असल्याने अत्यावश्यक वेळी
खुप वर्षापासुनची व्हेंटिलेटरची मागणी होती.
बापरे पुनः काळजी वाढली: बार्शी तालुक्यात शनिवारी 83 कोरोना बाधित रुग्ण सापडले; एकूण आकडा 2071
ही मागणी लावुन धरत आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे पाठपुरवा केल्याने उपजिल्हा रुग्णालयाला आता कायम स्वरुपी पाच व्हेंटिलेटर मिळवुन मिळाले असुन ते बसवण्याचे काम सध्या चालु असल्याचे माहिती डॉ. जिवन वायदंडे यांनी सांगितले. व्हेंटिलेटर मिळाले असले तरी सध्या व्हेंटिलेटर चालवण्यासाठी तज्ञ डॉक्टर नसल्याने व ईतर कर्मचारी तत्काळ उपलब्ध करून घ्यावेत अशी मागणी होत आहे.