आधी चोरीचा मोबाइल खरेदी करणारा सापडला, नंतर चोरट्याकडे चक्क ५० मोबाइल मिळून आले

0
65

आधी चोरीचा मोबाइल खरेदी करणारा सापडला, नंतर चोरट्याकडे चक्क ५० मोबाइल मिळून आले

दोघांना अटक : एका मोबाइल चोरीची होती तक्रार

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पंढरपूर : शहर पोलीस ठाण्यात एक मोबाइल चोरीस गेलेल्याची तक्रार दाखल झाली अन् गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तपास चक्रे फिरवताच चोरीचा मोबाइल खरेदी करणारा ग्राहकास सापडला आणि त्याच्यानंतर मोबाइल चोरी करणारा चोरटा तर सापडला त्याचबरोबर त्याच्याकडे विविध कंपनीचे 3 लाख ८९ हजार रुपये किमतीचे एकूण ५० मोबाइल मिळून आले आहेत.

व्ही. केंद्रे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यानंतर चोरीस गेलेल्या मोबाइल मध्ये सीताराम दामोदर जाधव (वय’ ४३, रा. वाढेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा त्याच्या नावावर असलेले सिमकार्ड टाकून वापरत असल्याची माहिती सायबर शाखेच्या तांत्रिक तपासाच्या आधारे प्राप्त झाली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सीताराम जाधव याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हा चोरीचा मोबाइल १ महिन्यापूर्वी चेतन चरणसिंग गौड (वय २५, रा. पारे, ता. सांगोला) याच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले. साक्षीदार जाधव यांच्याकडून
पोलिसांनी मोबाइल जप्त केला.

पोलीस ठाण्यात मोबाइल व सिमकार्ड चोरीस गेल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरीबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि सी . व्ही. केंद्रे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, सपोफौ राजेश गोसावी, पोहेकों सूरज हेंबाडे, शरद कदम, बिपीन ढेरे, पोलीस नाईक सचिन इंगळे, सुनील बनसोडे, दादा माने, राकेश लोहार, शोएब पठाण, सचिन हेंवाडे, सुजित जाधव, पोकों समाधान माने तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोकों अन्वर आतार यांनी केली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम, व पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली

मोबाईल चोरीतील सराईत गुन्हेगार
चेतन गौड यास तपासकामी ताब्यात घेतले. गुन्ह्याचे अनुषंगाने जाधव व गोंड यांना समोरासमोर घेऊन तपास केला. आरोपी गोंड हा मोबाइल (3) चोरीतील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यास अटक करून या गुन्ह्याचा पुढील तपास केला. त्याने युवराज गोरख कदम (वय ३८ • रा. गिरझणी, ता. माळशिरस) यांच्या मदतीने वेगवेगळ्या कंपनीचे ३ लाख ८९ हजार रुपयांचे ५० मोबाइल चोरल्याचे समोर आले. ते मोबाइल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here