तापाचे रुग्ण वाढले दवाखाने हाउसफुल!
उस्मानाबादेत डासांचे प्रमाण वाढले
उस्मानाबाद-19
सतत पडलेला पाऊस त्यामुळे निर्माण झालेली दलदल,चिखल, निचरा न झाल्याने साचलेले पाण्याचे डबके, रस्त्यावरचे खड्डे व त्यात साचलेले पाणी जागोजागचे कचऱ्याचे ढीग,तुंबलेल्या नाल्या,भटकी जनावरे व त्यांचे शेणी, भटक्या कुत्रांची भटकंती व त्यांची घाण,
वराहांचा मुक्त संचार,या अश्या परिस्थितीत वाढलेले डासांचे प्रमाण आणी तापाने त्रस्त नागरिक अशी उस्मानाबाद या जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठिकाणची नव्याने ओळख झाली आहे.

अशा अवस्थेत नागरिक राहत असल्याने साहजिकच आजाराला बळी पडत आहेत आणि रुग्णालयातील गर्दी वाढत आहे सध्या उस्मानाबाद शहर व परिसरातील नागरिकांना सर्दी, ताप ,डोकेदुखी, घसा दुखी, या त्रासाने हैराण केले असून दिवसेंदिवस दवाखान्यातील गर्दी वाढत आहे.


सध्या शहरात अस्वच्छता निर्माण झाली असून त्यामुळे डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे याशिवाय आता दिवसाही डास चावत असल्याने नागरिकांनी काळजीपोटी विविध मॉस्किटो रीपेलेंटचा वापर दिवसाही करणे सुरू केले आहे .
नागरिकांचे आरोग्य चांगले राहील यासाठी नगरपरिषद प्रशासन कुठेही काळजी घेताना दिसत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
