बार्शीत बनावट सोने तारण ठेवून दिड कोटीची फसवणूक फायनान्सच्या बार्शी शाखेत उघडकीस आला प्रकार

0
595

बार्शीत बनावट सोने तारण ठेवून दिड कोटीची फसवणून

जना स्मॉल  फायनान्सच्या बार्शी शाखेत उघडकीस आला प्रकार

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : कर्जदारांशी संगणमत करुन त्यांचे बनावट सोणे खरे असल्याचे भासवुन व बनावट इस्टीमेशन स्लिप तयार करुन बॅंकेच्या एकुण 148 प्रकरणात खोटे सोने तारण ठेवुन बॅकेची 1,42,90,797 रु ची फसवणुक केल्याचा प्रकार बार्शी शहरातील जना स्मॉल फायनान्सच्या बार्शी शाखेत उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे,उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील पाच जनावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अनिल एम. व्ही. वाघाडकर व्हल्युएटर्स प्रा. लिमीटेड ठाणे, दयानंद एकनाथ महामुनी रा. महादेव मंदीरजवळ वालवड ता. भुम जि. उस्मानाबाद, गोल्डलोन सेल्स़ एक्झीकेटीव्ह़ बाबासाहेब तानाजी जाधव रा. नवीन वस्ती कळंबवाडी (पानगांव) ता. बार्शी, मिलींद पवार व्हल्युअर असोसीएटस नाशीक यांचे मार्फतीने नेमलेले प्रविण भिमाशंकर महामुनी रा. सलगर गल्ली, बार्शी अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. 

बार्शी शाखेचे शाखा व्यवस्थापक अमोल कुलकर्णी वय 39 रा.ता.केज सध्या उपळाई रोड, बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 

22/05/2019 ते दिनांक 18/06/2020 या कालावधीत जना स्मल फायनान्स बकेत व्हल्युअर म्हणुन काम करणारे अनिल एम. व्ही. वाघाडकर, दयानंद महामुनी ,बॅकेकडील नेमलेले गोल्डलोन सेल्स़ एक्झीकेटीव्ह़ बाबासाहेब जाधव,मिलींद पवार व्हल्युअर असोसीएटस नाशीक यांचे मार्फतीने नेमलेले प्रविण महामुनी यांनी कांही कर्जदाराबरोब संगणमत करत बनावट असलेले सोने खरे असल्याचे भासवत व बनावट इस्टीमेशन स्लिप तयार करत 148 प्रकरणामध्ये खोटे सोने तारण ठेवुन बॅकेची फसवणुक केली आहे सदर प्रकरणी बॅकेतील संणकामध्ये ऑनलाईन भरलेली माहीती पडताळुन प्राप्त करुन घेवुन वरीष्ठांची परवानगी घेवुन तक्रार देण्यास आली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here